आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराव्यग्र दिनचर्येमुळे व्यायामासाठी वेळ मिळत नसल्याचा बहाणा सांगून अनेक जण व्यायाम करणे टाळतात. परंतु एका अध्ययनातील निष्कर्षानुसार या धारणेबाबत पुन्हा विचार करायला हवा. रोज ११ मिनिटांच्या हळूहळू ते वेगाने व्यायाम केल्यास मृत्यूची जोखीम कमी होते. ब्रिटनच्या केंब्रिज युनिव्हर्सिटीने १९६ अध्ययनांच्या डेटाच्या आधारे हो निष्कर्ष काढला आहे.
या अध्यनांमध्ये ३ कोटी प्रौढांवर सुमारे दहा वर्षे निगराणी ठेवली गेली. ब्रिटिश जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिनमध्ये हे संशोधन प्रकाशित झाले आहे. तसेही आठवड्यातून किमान १५० मिनिटे किंवा रोज २२ मिनिटे व्यायाम करण्याची शिफारस केली जाते. यामुळे एकूणच कोणत्याही आजाराने मृत्यूचा धोका ३१% कमी होतो. तर हृदयरोगामुळे मृत्यूचा धोका २९%, कॅन्सरमुळे मृत्यूची जोखीम १५% कमी होते. शिवाय हृदयरोग होण्याची शक्यता २७% आणि कॅन्सरची शक्यता १२% कमी होते. मात्र या अध्ययनात म्हटले की, ११ मिनिटे दररोज व्यायामामुळे लवकर मृत्यू होण्याची जोखीम २३% घटते. ११ मिनिटांचा व्यायाम १० पैकी एक मृत्यू रोखू शकतो. हृदयरोग्यांत १०.९% आणि कॅन्सरच्या घटनांत ५.२ % घट होऊ शकते. याशिवाय प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल संतुलित करण्यासाठीही याचे फायदे आहेत. जास्त शारीरिक हालचाली आणि हृदय, कर्करोगाचे आजार आणि अकाली मृत्यूचा धोका कमी होण्याचा थेट संबंध आहे.
काही सवयी बदलूनही आपले शरीर सक्रिय ठेवता येते क्विन्स युनिव्हर्सिटी बेलफास्टच्या लियांड्राे गार्शिया यांच्या मते व्यायाम म्हणजे एखादा खेळ किंवा पळणे असे आपण समजतो. पण अनेक वेळा काही सवयी बदलणेही गरजेचे असते. जसे की कारऐवजी पायी किंवा सायकलने ऑफिसला जाणे किंवा मुलांसोबत खेळणे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.