आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • British, Moroccan Exiles Sentenced To Death For Fighting Ukraine, Russian Court Convicts In Donbass For Helping Ukraine

निकाल:युक्रेनला युद्धावर गेलेल्या ब्रिटिश, मोरोक्‍कोच्या 3 जणांना मृत्युदंड, युक्रेनला मदत केल्यावरून डोनबासमध्ये रशियन कोर्टाकडून दोषी

कीव्ह22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशियाचे युक्रेनवर १०७ व्या दिवशीही हल्ले सुरूच होते. त्यातच रशियन सैन्याच्या विराेधात लढण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेल्या दाेन ब्रिटिश व एका मोरोक्‍को नागरिकाला अटक झाली. या नागरिकांना मृत्युदंड ठाेठावण्यात आला. रशियन समर्थक डाेनबास भागातील एका रशियाच्या न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. खरे तर हा निर्णय देणाऱ्या न्यायालयास आंतरराष्ट्रीय मान्यता नाही. हे न्यायालय डाेनेत्स्क प्रजासत्ताकमध्ये येते. आपण स्वायत्त असल्याचे या प्रांताने घाेषित केले आहे. हा प्रांत रशियाचे समर्थन करताे. ब्रिटनचे अॅडन असलिन व शाॅन पिनर आणि मोरोक्‍कोचे ब्राहिम सौदून यांच्यावर व्यावसायिक हल्लेखाेर असल्याचा आराेप होता. या तिघांवर हत्या, सत्ता मिळवण्यासाठी हिंसाचार व दहशतवादी कारवायांसाठी प्रशिक्षण घेतल्याचा ठपका ठेवल्याचे एका सरकारी अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगण्यात आल. ब्रिटनने हा निर्णय आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन म्हटले आहे. युक्रेनमध्ये १६ हजारांहून जास्त स्वयंसेवक लढण्यासाठी गेले होते.

युक्रेनचे २०० सैनिक राेज मृत्युमुखी, पाश्चात्त्य देशांनी शस्त्रे आणखी द्यावीत
युक्रेनचे राष्ट्रपती व्लादिमीर झेलेन्स्की यांचे निकटवर्तीय मायखाइलाे पाेडाेल्याकी यांच्या म्हणण्यानुसार दरराेज सुमारे १०० ते २०० युक्रेनी सैनिकांचा मृत्यू होत आहे. पूर्व डाेनबास प्रांतात रशियाचा सामना करण्यासाठी युक्रेनला पश्चिमेकडील देशांच्या मदतीची गरज आहे. पश्चिमेकडील देशांची शस्त्रे आम्हाला मदत करू शकतात. आतापर्यंत मिळालेल्या आश्वासनांपैकी केवळ १० टक्के शस्त्रे मिळाली.

रशिया - पाश्चात्त्य तोफा नष्ट केल्या
रशियन लष्करातील एक अधिकारी म्हणाले, युक्रेनला पाश्चात्त्य देशांकडून िमळालेल्या ताेफा नष्ट करण्यात आल्या आहेत. हल्ल्याच्या काळात नाॅर्वेकडून मिळालेल्या हाॅवित्झर ताेफा व अमेरिकेकडून मिळालेली शस्त्रास्त्रे प्रणालीचे नुकसान झाले. डाेनबासवर वर्चस्व मिळवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे,

पहिल्यांदाच प्रशांत क्षेत्रातील देशही
मिरसिया जाेएन म्हणाले, शिखर संमेलनात पहिल्यांदाच प्रशांत क्षेत्रातील नाटाेचे सहकारी देश आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जपान व दक्षिण काेरियादेखील सहभागी होतील. बैठकीत आेपन-डाेअर पाॅलिसी व नाटाेच्या विस्तारावर चर्चा होणार आहे. लवकरच फिनलंड व स्वीडनही नाटाे सदस्य होतील.

नाटाे बैठकीत झेलेन्स्की सहभागी होणार
युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की २८ व २९ जून राेजी स्पेनच्या माद्रिदमध्ये होणाऱ्या नाॅर्थ अटलांटिक ट्रिटी आॅर्गनायझेशनच्या (नाटाे) बैठकीत सहभागी होतील. नाटाेच्या उपमहासचिव मिरसिया जाेएन म्हणाले, संमेलनात झेलेन्स्की यांना िनमंत्रण देण्यात आले आहे.

युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की २८ व २९ जून राेजी स्पेनच्या माद्रिदमध्ये होणाऱ्या नाॅर्थ अटलांटिक ट्रिटी आॅर्गनायझेशनच्या (नाटाे) बैठकीत सहभागी होतील. नाटाेच्या उपमहासचिव मिरसिया जाेएन म्हणाले, संमेलनात झेलेन्स्की यांना िनमंत्रण देण्यात आले आहे.

आेपन डाेअर पाॅलिसीद्वारे युराेपीय देश नाटाे सदस्यत्वासाठी अर्ज करू शकतात. त्यानंतर नाटाे कलेक्टिव्ह डिफेन्सच्या मूळ तत्त्वानुसार संकट आल्यानंतर सदस्य राष्ट्राला मदत करतील. एक किंवा त्यापेक्षा जास्त सदस्यांवर झालेला हल्ला सर्व सदस्य देशांवरील हल्ला मानला जाताे. त्यालाच कलेक्टिव्ह डिफेन्स धाेरण म्हटले जाते.

बातम्या आणखी आहेत...