आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदवीबाबत प्रश्न:श्रीमंत देशांमध्ये महागडे शिक्षण, मात्र नोकरी नाही; पदवीचा कल घसरला

अमेरिका2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिका, ब्रिटनसह श्रीमंत देशांत महाविद्यालयीन पदवीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. पदवीबाबतच्या बदलत्या मानसिकेमागची अनेक कारणे आहेत. यामध्ये प्रामुख्याने कॉलेजच्या फिसमध्ये वाढ होणे आहे. वाढत्या महागाईमुळे शुल्क वाढले आहे, यामुळे विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबांना शिक्षणासाठी मोठे कर्ज उचलावे लागत आहे. वॉल स्ट्रीट जर्नलच्या एका सर्व्हेनुसार, १८ ते ३४ वर्षांच्या ५६% अमेरिकींच्या म्हणण्यानुसार, ४ वर्षांची पदवी त्यांना अपेक्षेनुसार, रोजगार देण्यात फायदेशीर नाही. दुसरीकडे, श्वेतवर्णीय विद्यार्थ्यांच्या तुलनेत दक्षिण आशियाई(भारतीय) पदवीधारक विद्यार्थ्यांसाठी रोजगाराची शक्यता जास्त असते. कारण, हे विद्यार्थी व्यापारासारख्या विषयांचा अभ्यास करत आहेत.

ब्रिटन वार्षिक ९ लाख रु.ट्यूशन फीस घेतो, श्रीमंत देशांत सर्वात जास्त ब्रिटनमध्ये १९९० च्या दशकाच्या अखेरपर्यंत ट्यूशन फीस लागत नव्हती. आता तेथे सरारी ट्यूशन फीस ११ हजार डॉलर(सुमारे ९ लाख रु.) वार्षिक आहे. ही श्रीमंत देशांत सर्वात जास्त आहे.अमेरिकेत पदवी विद्यार्थी आऊट-ऑफ पॉकेट शुल्क १९७० च्या दशकात २,३०० डॉलर(१.९ लाख रु.) होते.

‘कॉलेज-व्हेज प्रीमियम’ पुन्हा कमी होत आहे १९८० च्या दशकात पदवी घेणाऱ्यांच्या उत्पन्नात वाढ सुरू झाली. तेव्हा त्यास“कॉलेज व्हेज प्रीमियम’ प्रीमियम नाव दिले . या दरम्यान हायस्कूल उत्तीर्ण असणाऱ्यांना ३५% जास्त वेतन मिळते. २०२१ पर्यंत फरक ६६% झाला. आता वेतन प्रीमियम कमी झाले आहे.

ड्रॉप आऊटमुळे अडचणींचा सामना करावा लागतो रिसर्च फर्म इन्स्टिट्यूट फॉर फिस्कल स्टडीजनुसार इंग्लंडमध्ये २५% पुरुष पदवी व १५% पदवीधर महिलांना करिअरमध्ये पदवीधर नसलेल्यांपेक्षा कमी वेतन मिळते. काेणत्याही पात्रतेशिवाय ड्राॅप आऊट झाल्याने मोठे नुकसान होते. ४०% पेक्षाही कमी लोक वेळेत काेर्स पूर्ण करतात.

इंग्रजी, इतिहास, धर्मशास्त्र विषयांत संधी कमी {राेजगारासाठी पदवीचा याेग्य विषय निवडणे मोठे आव्हान आहे. ब्रिटनमध्ये आर्ट्‌स(१०% पेक्षा कमींनाच योग्य जॉब मिळू शकतो). सामाजिक देखभाल आणि कृषीच्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळणे कठीण आहे. {अमेरिकेत सर्वात जास्त कमाई करणाऱ्या पदव्या अभियांत्रिकी, संगणकशास्त्र आणि बिझनेस आहेत. संगीत आणि व्हिज्युअल आर्ट‌्‌समध्ये जॉब मिळत नाहीत. {फेब्रुवारीत व्हर्जिनियात मेरीमाउंट युनिव्हर्सिटीच्या ट्रस्टिंनी इंग्रजी, इतिहास, अर्थशास्त्रासह नऊ विषयांमध्ये प्रमख विषय संपुष्टात आणण्यासाठी मतदान केले. { मिशिगनमध्ये केल्व्हिन युनिव्हर्सिटी व वाॅशिंग्टनमध्ये हार्वर्ड युनिव्हर्सिटीने क्लासिक्स वगळले आहे.