आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या वर्षापासून सुरू असलेल्या कोरोना महामारीमुळे लोकांच्या झोपेवर वाईट परीणाम झाला आहे. जगभरात अनेक लोक कोरोनासोम्निया (कोरोना+इंसोम्निया) नामक आजाराच्या विळख्यात सापडले आहेत.
एक्सपर्ट्सनुसार वर्षभरापासून तणावामुळे आपली झोप खराब होत गेली. अमेरिकन अकॅडमी ऑफ स्लीप मेडिसिननुसार 2020 च्या सर्व्हेमध्ये खुलासा झाला की, अमेरिकेमध्ये 20% लोक झोप न येण्याच्या समस्येचा सामना करत होते, जे आता वाढून 60% झाले आहे. जर तुम्हीही यापासून त्रस्त असाल तर जाणुन घ्या यापासून कशी सुटका मिळवता येऊ शकते.
या चार पध्दती अवलंबल्याने मिळू शकते सुटका
1. 25 मिनिटात झोप आली नाही तर उठा
कॅलिफोर्निया यूनिव्हर्सिटीमध्ये न्यूरोसायन्सचे प्रोफेसर मॅथ्यू वॉकर यांच्यानुसार बेडवर गेल्याव 25 मिनिटांच्या आत झोप आली नाही तर उठा. थोडे स्ट्रेच करा. सोफ्यावर पसून ध्यान लावा. कमी प्रकाशात पुस्तक वाचा.
डीब ब्रीदिंग एक्सरसाइज करा. आपण आनंददायी पॉडकास्ट ऐकू शकता. खुर्चीवर बसून आर्ट बनवा. जर आपल्याला झोप येत असेल तर परत झोपा. परंतु लक्षात ठेवा, जोपर्यंत थकवा जाणवणार नाही, तोपर्यंत बेडवर जाऊ नका.
2. सकाळी 15 मिनिटे ऊन अवश्य घ्या
क्लीनिकल सायकोलॉजिस्ट मायकल ब्रूस म्हणतात की, दररोज एकाच वेळी उठा. मग झोप कमी झाली असेल तरीही चालेल. सुट्टीच्या दिवशीही जास्त झोपू नका. हळुहळू झोपण्याची वेळ चांगली होईल.
रोज सकाळी 15 मिनिटे ऊन अवश्य घ्या. यामुळे मेलाटोनिन रिलीज थांबते. यामुळे सकाळी ब्रेन फॉगची स्थिती तयार होत नाही. या व्यतिरिक्त रोज एक्सरसाइज करा. यामुळे गंभीर अनिद्रेमुळे ग्रस्त लोकांच्या झोपेत 20 मिनिटांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
3. चिंतांपासून दूर राहा
पेंसिल्वेनिया यूनिव्हर्सिटीमध्ये स्लीप मेडिसिन एक्सपर्ट डॉ. इलीन रोसेन म्हणतात की, झोपण्यापूर्वी तुम्हाला ज्या गोष्टींचा त्रास होतो त्या सर्व गोष्टी कागदावर लिहाल. जसे की, एखादे काम करायचे आहे, कुणाला फोनवर बोलायचे आहे किंवा बिल भरायचे आहे. लिहिलेल्या गोष्टींमध्ये समानता असेल तर कागद कचऱ्यात टाका. त्याला कल्पनांचे वितरण असे म्हणतात.
4. बेडला वर्कस्टेशन बनवू नका
डॉ. ब्रूस म्हणतात की, बेडवर ऑफिसचे काम करु नका. यामुळे मेंदू सतर्क आणि तणावग्रस्त राहू शकतो. घरात दुसऱ्या रुममध्ये झोपण्याचा पर्याय असेल तर फायदा मिळू शकतो.
दिवसा जो गोष्टी पाहू शकला नाहीत, त्यासाठी स्क्रीनमध्ये डोळे ताणून रात्र खराब करु नका. दुपारी 2 वाजल्यानंतर चहा-कॉफी पिऊ नका. यामुळे शरीराला मेटाबॉलिज्मसाठी पुरेसा वेळ मिळतो.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.