आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Exploitation Of 1.5 Million Children In Religious Places Around The World, April National Child Abuse Prevention Month In US| Marathi News

मुलांचे शोषण:जगभरातील धार्मिक स्थळी 15 लाख मुलांचे शोषण, अमेरिकेत एप्रिल नॅशनल चाइल्ड अब्यूज प्रिव्हेन्शन मंथ

वॉशिंग्टन4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

धर्माच्या आडून लहान मुलांचे लैंगिक शोषण केले जात आहे. त्यापासून विकसित देशही वेगळे नाहीत. विविध आंतरराष्ट्रीय संस्थांच्या म्हणण्यानुसार २५० वर्षांत सुमारे १५ लाख मुलांचे शोषण झाले आहे. कॅनडातील निवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या शोषण प्रकरणात ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी क्षमा मागितली आहे. अमेरिकेत एप्रिल महिना लहान मुलांच्या लैंगिक शोषण प्रतिबंधक महिना म्हणून आयोजित केला जातो. यानिमित्ताने जगभरात मुले दुराचाराचे कशा प्रकारे बळी ठरू लागले आहेत, हे जाणून घेऊ...

भारत-पाकिस्तानातील आकडे उपलब्ध नाहीत थायलंड, कंबोडिया, म्यानमार व भूतानमधील बौद्ध भिक्खूंवर अत्याचाराचे आरोप झाले. २०१३ मध्ये मठांमध्ये तरुणांवर अत्याचार झाला होता, असा दावा केला होता.

पाकिस्तानात धर्मस्थळी अशी प्रकरणे दडवण्याचा प्रयत्न केला जातो. भारतात देखील आकडे उपलब्ध नाहीत. कॅनडात १८४० पासून १९९६ पर्यंत कॅथोलिक चर्च सरकारसोबत शेकडो निवासी शाळा चालवत. त्यात १५ लाख मुले होते. या शाळांत ४ हजार मुलांच्या कबरी सापडल्या.

इटलीत सर्वाधिक १० लाख मुलांचे शोषण

देश कालावधी खटला दोषी इटली 1952-2022 10 लाख आकडे उपलब्ध नाहीत फ्रान्स 1950-2020 2.16 लाख आकडे उपलब्ध नाहीत ऑस्ट्रेलिया 1950-2010 4,444 7% पाद्री दोषी जर्मनी 1946-2014 3,677 1670 पाद्री दोषी न्यूझीलंड 1950- 2021 2.5 लाख 14% पाद्री दोषी अमेरिका 1940-2021 1000 301 पाद्री दोषी पाकिस्तान 10-20% बाल लैंगिक शोषणाची मदरशातील प्रकरणे

बातम्या आणखी आहेत...