आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Explosion In Godown Near Moscow Railway Station I Two storey Building Gutted I No Casualties I Latest News And Update 

मॉस्को रेल्वे स्टेशनजवळील गोदामात स्फोट:27 हजार चौरस मीटर परिसरात आग पसरली, दुमजली इमारत जळून खाक

नवी दिल्ली7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशियाची राजधानी मॉस्को येथील कोमसोमोल्स्काया रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या दुमजली गोदामात स्फोट झाला आहे. या स्फोटामुळे सुमारे 27,000 चौरस मीटर परिसरात आग लागली आहे.

घटनास्थळावरील एका अधिकाऱ्याने सांगितले की, स्फोट झाल्याने आगीचे भडका घेतला. अग्निशमन दलाच्या 80 गाड्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला केला जात आहे. दरम्यान, लष्कराच्या तीन हेलिकॉप्टरची देखील आग आटोक्यात आणण्यासाठी मदत घेतली गेली आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, हा स्फोट नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप स्पष्ट झालेले नाही. याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

याआधी देखील घडला होता अपघात; 8 अग्निशमन दलाचा मृत्यू

रशियातील पूर्व मॉस्को येथील एका गोदामाला 22 सप्टेंबर रोजी भीषण आग लागली होती. यात आग आटोक्यात करण्यासाठी गेलेल्या 8 अग्निशमन दलाच्या जवानांचा मृत्यू झाला होता. आपत्कालीन सेवा मंत्रालयाने येथे एका निवेदनात म्हटले होते की, गुरुवारी (२२ सप्टेंबर) या अग्निशमन दलाचा संपर्क तुटला आणि नंतर त्यांचे मृतदेह सापडले. आग विझवण्यात ते इकके गुंतले होते. भीषण आग, उच्च तापमान आणि दाट धुरामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना बाहेर पडता आले नाही, असे त्यावेळी प्रशासनाकडून सांगण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...