आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Explosion Suspected In Nord Stream Gas Pipeline । Leak Causes 1km wide Bubbles In Sea, Accusations Between Europe Russia । What Is Nord Stream

युरोपची 'लाइफलाइन' उडवली कुणी?:नॉर्ड स्ट्रीम गॅस पाइपलाइनमध्ये स्फोटाची शंका, गळतीमुळे समुद्रात 1 किमी व्यासाचा बुडबुडा, युरोप- रशियात आरोप-प्रत्यारोप

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वीडनच्या राष्ट्रीय भूकंप नेटवर्कने मंगळवारी सांगितले की, त्यांना बाल्टिक समुद्राखालील रशियन गॅस पाइपलाइनमध्ये दोन स्फोट आढळले आहेत. नेटवर्कने सांगितले की, त्यांनी बोर्नहोमच्या डॅनिश बेटाच्या आग्नेय भागात सोमवारी पहाटे एक स्फोट नोंदवला, तर दुसरा बेटाच्या ईशान्य भागात होता. नंतरचा उद्रेक हा 2.3 रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या समतुल्य असल्याचे त्यात म्हटले आहे. पोलंड आणि डेन्मार्कमधील राजकारणी आणि तज्ज्ञांनी बाल्टिक समुद्रमार्गे रशियापासून जर्मनीपर्यंतच्या दोन नैसर्गिक वायू पाइपलाइनमध्ये असामान्य गळतीची भीती व्यक्त केली.

गळतीची समस्या गंभीर का?

पाइपलाइनमध्ये गळतीची समस्या अशा वेळी आली आहे, जेव्हा पोलंड आणि युरोपला रशियन गॅस पुरवठ्यापासून वेगळे करण्यासाठी डिझाइन केलेल्या पाइपलाइनचे उद्घाटन होणार आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, गळतीमुळे ऊर्जा पुरवठ्याला धोका नाही, कारण रशिया पाइपलाइनद्वारे गॅस पुरवठा करत नाहीये. त्याचा पर्यावरणावर मर्यादित परिणाम होणार असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. डॅनिश अधिकाऱ्यांनी सोमवारी जाहीर केले की, नॉर्ड स्ट्रीम -2 पाइपलाइनमध्ये गळती आढळून आली आहे, तिचा वापरच सुरू नव्हता.

समुद्रात तब्बल 1 किमी व्यासाचा गॅसचा बुडबुडा

भूकंपशास्त्रज्ञांनी गळती होण्यापूर्वी पाण्याखालील स्फोटांची माहिती दिली. डेन्मार्कच्या डिफेन्स कमांडने गळतीचे फुटेज प्रसिद्ध केले आहे, ज्यात बुडबुडे दिसत आहेत- बाल्टिक समुद्रातील सर्वात मोठा बुडबुडा हा तब्बल 1 किमी व्यासाचा आहे यावरून आपल्याला या गळतीचा अंदाज येऊ शकतो.

या गळतीनंतर समुद्रात 1 किमी व्यासाच्या आकाराचा नैसर्गिक वायूचा बुडबुडा दिसू लागला आहे.
या गळतीनंतर समुद्रात 1 किमी व्यासाच्या आकाराचा नैसर्गिक वायूचा बुडबुडा दिसू लागला आहे.

नॉर्वेचाही युरोपला गॅस पुरवठा, रशियावर अवलंबित्व कमी होणार

रशियातून बाल्टिक समुद्रमार्गे जर्मनीकडे येणाऱ्या दोन नैसर्गिक वायू पाइपलाइन मंगळवारी असामान्य गळतीमुळे खराब झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे पोलंडसाठी बहुप्रतीक्षित पाइपलाइनच्या उद्घाटनाकडे जगाचे फारसे लक्ष गेले नाही. फ्रेड्रिक्सन, मोराविकी आणि पोलंडचे अध्यक्ष आंद्रेज डुडा यांनी मिळून बाल्टिक पाइपचा भाग असलेल्या यलो पाइपचा व्हॉल्व्ह प्रतीकात्मकपणे उघडून गॅस पुरवठा सुरू केला. या पाइपलाइनच्या मदतीने नॉर्वेतून येणारा नैसर्गिक वायू डेन्मार्क आणि बाल्टिक समुद्रमार्गे पोलंडला पोहोचेल. या नव्या पाइपलाइनमुळे नॉर्वेतून युरोपला गॅसचा पुरवठा होईल आणि युरोपचे रशियन गॅसवरील अवलंबित्वही कमी होईल. पोलंडचे पंतप्रधान मॅट्युझ मोराविकी यांनी या घटना 'नुकसान पोहोचवण्याची कृती' असे केले, तर डॅनिश पंतप्रधान माटे फ्रेड्रिक्सन म्हणाले की, नॉर्ड स्ट्रीम 1 आणि 2 मध्ये आदल्या दिवशी 3 ठिकाणी गळती आढळून आली, त्यांनाही पुढे नुकसान पोहोचवू शकण्याची शंकाही त्यांनी नाकारली नाही.

काय आहे नॉर्ड स्ट्रीम?

नॉर्ड स्ट्रीम 1 आणि नॉर्ड स्ट्रीम 2 या दोन रशियन पाइपलाइनने नैसर्गिक वायूचा पुरवठा युरोपियन देशांना होतो. नॉर्ड स्ट्रीम 1 सेंट पीटर्सबर्गजवळील रशियन किनाऱ्यापासून उत्तर-पूर्व जर्मनीपर्यंत बाल्टिक समुद्राखाली 745 मैल (1,200 किमी) पसरलेली आहे. त्याची जुळी पाइपलाइन, नॉर्ड स्ट्रीम 2, रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर थांबवण्यात आली.

गळती झाली तेव्हा दोन्ही पाइपलाइनमध्ये गॅस होता, परंतु सध्या रशियाकडून पुरवठा खंडित आहे. युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धामुळे सध्या सुरू असलेल्या ऊर्जा अस्थैर्यामुळे नॉर्ड स्ट्रीम-1 मधून गॅस पुरवठा बंद करण्यात आला होता, तर त्याला समांतर असलेल्या नॉर्ड स्ट्रीम-2 मधून पुरवठा सुरूच झालेला नाही.

नॉर्ड स्ट्रीम 1 आणि नॉर्ड स्ट्रीम 2 या दोन रशियन पाइपलाइनने नैसर्गिक वायूचा पुरवठा युरोपियन देशांना होतो.
नॉर्ड स्ट्रीम 1 आणि नॉर्ड स्ट्रीम 2 या दोन रशियन पाइपलाइनने नैसर्गिक वायूचा पुरवठा युरोपियन देशांना होतो.

युरोपियन युनियनने रशियावर थेट आरोप करणे टाळले

युरोपियन युनियनने म्हटले आहे की, रशियापासून युरोपपर्यंतच्या दोन मोठ्या गॅस पाइपलाइनमधील गळती स्फोटांमुळे झाली, परंतु त्यांनी थेट रशियावर आरोप करणे टाळले आहे. जाणूनबुजून हे केले असल्यास योग्य तो प्रतिसाद मिळेल, असे युरोपियन कमिशनच्या प्रमुख उर्सुला वॉन डेर लेयन यांनी म्हटले आहे.

ईयू कमिशनच्या प्रमुख उर्सुला यांनी रशियावर थेट आरोप केला नाही, परंतु त्यांनी हे जाणूनबुजून केलेले असल्यास, योग्य तो मजबूत प्रतिसाद दिला जाईल, असा इशारा दिला आहे.
ईयू कमिशनच्या प्रमुख उर्सुला यांनी रशियावर थेट आरोप केला नाही, परंतु त्यांनी हे जाणूनबुजून केलेले असल्यास, योग्य तो मजबूत प्रतिसाद दिला जाईल, असा इशारा दिला आहे.

युक्रेनचा रशियावर थेट आरोप

युरोपियन युनियनने यापूर्वी रशियावर गॅस पुरवठा आणि नॉर्ड स्ट्रीम लाइनचा पश्चिमेविरुद्ध शस्त्र म्हणून वापर केल्याचा आरोप केला आहे. रशियाने बाल्टिक समुद्रातील नॉर्ड गॅस पाइपलाइनचा स्फोट केल्याचा युक्रेनचा आरोप आहे. युक्रेनचे अध्यक्षीय सल्लागार मायकालो पडोल्याक यांनी रशियाने गॅस पाइपलाइन स्फोट करून युरोपमध्ये हिवाळ्यापूर्वीच गोंधळाची परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. स्वीडनने या स्फोटांची चौकशी सुरू केली आहे.

अमेरिकेचे सचिव ब्लिंकन म्हणाले- हे कोणाच्याही हिताचे नाही

यूएस स्टेट सेक्रेटरी अँटनी ब्लिंकन म्हणाले की, त्यांना वाटते की, या गळतीचा युरोपच्या ऊर्जेच्या गरजेवर लक्षणीय परिणाम होणार नाही. जरी त्या दोन्ही पाइपलाइनमध्ये गॅस असेल तर दोन्हींपैकी एकातूनही सध्या गॅसची वाहतूक होत नाही. ब्लिंकेन यांनीही रशियावर थेटपणे आरोप केले नाहीत, परंतु ते जाणीवपूर्वक घडवून आणल्यास ते "कोणाच्याही हिताचे नाही" असे ते नक्कीच म्हणाले आहेत.

रशियाचे अमेरिकेकडेच बोट

रशियन टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, रशियाने या गळतीप्रकरणी अमेरिकेकडेच बोट दाखवले आहे. रशयिन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोव्ह यांनी म्हटले आहे की, युरोपियन युनियन कमिशनच्या प्रमुख उर्सुला वॉन डेर लेयन यांनी म्हटले होते की, ही गळती जाणूनबुजून केली असल्यास योग्य तो मजबूत प्रतिसाद देऊ, त्या हा इशारा कुणाला देत आहेत. मला समजत नाही. जे घडले त्याबद्दल पोलंडचे एमईपी सिकोर्स्की यांनी अमेरिकेचे आभार मानले, तर येथे उर्सुला कोणाला 'धमकी' देत आहे?" त्यांनी सोशल मीडियावर हा सवाल केला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी फेब्रुवारीच्या सुरुवातीला रशियाने युक्रेनमध्ये लष्करी कारवाई सुरू करण्यापूर्वी इशारा दिला होता की, जर मॉस्कोने कीव्हविरुद्ध कारवाई केली, तर "यापुढे नॉर्ड स्ट्रीम 2 राहणार नाही. आम्ही त्याचा अंत करू." एका पत्रकाराने त्यांना त्याचा नेमका अर्थ काय आहे हे स्पष्ट करण्यास सांगितले, ज्यावर बायडेन उत्तरले होते- “मी तुम्हाला वचन देतो, आम्ही ते करू दाखवू.” बायडेन यांच्या या वक्तव्यावर बोट ठेवत आता रशियाने या गळतीप्रकरणी अमेरिकेला जबाबदार धरले आहे.

बातम्या आणखी आहेत...