आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Expo Park In Shanghai Also Converted Into Corona Hospital! Corona Is Spreading Rapidly In China| Marathi News

कोरोनाचा फैलाव:शांघाय येथील एक्स्पो पार्कचेही कोरोना रुग्णालयात रूपांतर! चीनमध्ये कोरोनाचा झपाट्याने फैलाव होत आहे

शांघाय4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चीनमध्ये कोरोनाचा फैलाव होत आहे. चोवीस तासांत १६ हजार ४१२ बाधित आढळून आले आहेत. त्यापैकी १३ हजारांहून जास्त प्रमुख व्यावसायिक केंद्रे असलेल्या शांघायमध्ये आढळले. झीरो कोविड धोरणावर वाटचाल करणाऱ्या चीनने परिस्थितीवर नियंत्रणासाठी शांघायच्या २.६ कोटी लोकसंख्येसाठी लॉकडाऊन लागू केल्याने ते कैद झाले आहेत. आता रुग्णांसाठी शहराबाहेर अस्थायी स्वरूपाची रुग्णालये उभारली जात आहेत. तेथे फ्लॉवर एक्स्पो सेंटरपासून प्रदर्शन केंद्रापर्यंतच्या व्यवस्थेपर्यंत सर्वकाही रुग्णालयात रूपांतरित केले जात आहे. या रुग्णालयात २० हजार रुग्ण भरती होऊ शकतात. कोरोना संसर्गाचा वेग पाहता सरकारने देशभरात ६० अस्थायी रुग्णालये उभारण्याचे ठरवले आहे. रुग्णालयांमध्ये ७० हजार खाटा असतील.

सवलत : बाधित मुलांसोबत आई-वडील
शांघायमधील वाढत्या संसर्गानंतर शहरातील संख्या २०२० च्या वुहानमधील रुग्णसंख्येचाही विक्रम मोडित काढू शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. वुहानमध्ये तेव्हा एका दिवसात १५ हजार बाधित आढळून आले होते. शहरात मार्चमध्ये एकही रुग्ण नसताना ही संख्या वाढली कशी, असा प्रश्न सरकारला सतावू लागला आहे. सरकारने नियमांत बदल करून बाधित आई-वडिलांना बाधित मुलांसोबत राहता येईल.

बातम्या आणखी आहेत...