आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Exposing Facebook's Advertising Policy; In Australia, Children Are Shown Advertisements For Alcohol, Smoking And Gambling

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:फेसबुकच्या जाहिरात धोरणाचा पर्दाफाश; ऑस्ट्रेलियात मुलांना दारू, धूम्रपान, जुगाराच्या जाहिराती दाखवतेय

मेलबर्न9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फेसबुक प्रौढांसाठीच्या जाहिरातीही मुलांना दाखवतेय : रिसेट

फेसबुकच्या जाहिरात धोरणाचा पर्दाफाश झाला आहे. या वेळी कंपनीने ऑस्ट्रेलियात १३ ते १७ वर्षांच्या किशोरवयीन मुलांना लक्ष्य केले आहे. कंपनीने आपल्या प्लॅटफॉर्मवर फक्त ३ डॉलरमध्ये म्हणजे २२५ रुपयांत दारू, धूम्रपान, जुगार आणि त्वरित वजन घटवणे यांसारख्या जाहिराती मुलांनाही दाखवण्यास मंजुरी दिली आहे. ‘रिसेट’ या आॅस्ट्रेलियातील लॉबी ग्रुपने अलीकडेच जारी केलेल्या अहवालात हे स्पष्ट केले आहे. ग्रुपने ‘ओजी न्यूज नेटवर्क’च्या नावावर फेसबुक पेज बनवून पडताळणी केली तेव्हा फेसबुक स्वत: थेट जाहिराती देत नाही, पण दारू-सिगारेटच्या कंपन्या मुलांना लक्ष्य करून त्यांना या जाहिराती दाखवू इच्छित असेल तर फेसबुक त्यांना रोखत नाही असे दिसले. त्यात ऑनलाइन डेटिंगसारख्या जाहिरातींचाही समावेश आहे.

एवढेच नाही तर या नव्या पेजच्या माध्यमातून जारी होत असलेल्या जाहिराती फेसबुकने १३ ते १७ वर्षे वयोगटाच्या ७.४० लाख मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रस्तावही दिला. जेव्हा या ग्रुपने जाहिरातींचे मापदंड आणखी कठोर केले तेव्हा ज्या जाहिराती १८ वर्षांवरील मुलांनाच ते दाखवू इच्छित होते, त्या जाहिरातीही किशोरवयीन मुलांपर्यंत सहजपणे पोहोचत आहेत असे दिसले. ‘द गार्डियन’ या ब्रिटिश वृत्तपत्रात प्रकाशित वृत्तानुसार, ५२ हजार किशोरवयीन मुलांपर्यंत दारूची जाहिरात पोहोचवण्यासाठी फेसबुक २२५ रुपये घेते. १४ हजार मुलांपर्यंत जुगाराची जाहिरात पोहोचवण्यासाठी दर होता ८३५ रुपये. १००० किंवा त्यापेक्षा जास्त मुलांत सिगारेट किंवा ई-सिगारेटची जाहिरात १० ते १२ हजार रुपयांत पोहोचवली जाऊ शकते. या संस्थेने संपूर्ण तयारी केल्यानंतर आणि फेसबुककडून स्वीकृती मिळवल्यानंतर जाहिराती प्रकाशित केल्या नाहीत.

सरकारच्या भूमिकेमुळे संतप्त, सरकारी जाहिरात जारी केली नाही
अाॅस्ट्रेलियात एकाधिकाराचा दंभ असणाऱ्या फेसबुकच्या विरोधात सरकारनेही कडक भूमिका घेतली आहे. सरकारने अलीकडेच कायदा तयार केल्यानंतर फेसबुकला बातम्यांसाठी वृत्तपत्र प्रकाशकांना पैसे द्यावे लागले. त्यामुळे फेसबुकचा एवढा तिळपापड झाला की तिने सरकारची लस टोचून घेण्याचे आवाहन करणारी जाहिरातही जारी केली नाही.

बातम्या आणखी आहेत...