आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटनचा असांजेला झटका:'विकिलिक्स'च्या प्रमुखांचे अमेरिकेला होणार प्रत्यार्पण, ब्रिटीश सरकारने दिली मंजुरी

लंडन14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटीश सरकारने विकिलिक्सच्या ज्यूलियन असांजेचे अमेरिकेला प्रत्यार्पण करण्यास मंजुरी दिली आहे. असांजे ऑस्ट्रेलियन नागरिक असून, त्यांच्यावर हेरगिरीचा आरोप आहे. 2019 पासून ते लंडनच्या बेल्मार्श तुरुंगात बंदिस्त आहेत.

ज्युलियन असांजे यांनी 2010 मध्ये अमेरिकन लष्कराशी संबंधित अनेक गोपणीय दस्तावेज सार्वजनिक केले होते. यात अफगाणिस्तान व इराक युद्धाशी संबंधित संवेदनशील दस्तावेजांचा समावेश होता. या दस्तावेजांमुळे अमेरिकन लष्कराचा क्रूर चेहरा जगापुढे आला होता. या घटनेनंतर अमेरिका त्यांच्या मागे हात धुवून लागली होती. त्यामुळे त्यांनी ब्रिटन स्थित इक्वेडोरच्या दुतावासात आश्रय घेतला होता. त्यानंतर 2019 मध्ये त्यांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासूनच अमेरिका त्यांच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्नशील होती. अखेर, ब्रिटन सरकारने त्यांच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा करुन अमेरिकेची एक मोठी मागणी पूर्ण केली आहे.

असांजेपुढे आणखी कायदेशीर मार्ग

ब्रिटन सरकारने असांजेचे अमेरिकेला प्रत्यार्पण करण्यास मंजुरी दिली असली तरी असांजेकडे या निर्णयाला कायदेशीर आव्हान देण्याचा पर्याय उपलब्ध आहे. त्यांना पुढील 14 दिवसांत या आदेशांना आव्हान देता येईल. सद्यस्थिती पाहता ते लवकरच या कायदेशीर पर्यायातचा वापर करतील असा अंदाज आहे.

बातम्या आणखी आहेत...