आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज जल दिन:पृथ्वीच्या ध्रुवांवर तीव्र उष्णता, हीच परिस्थिती राहिल्यास बर्फ वितळेल, 200 फुटांपर्यंत वाढेल समुद्राचा जलस्तर

वॉशिंग्टन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अत्यंत गतीने बदलत असलेल्या वातावरणामुळे पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवांवर सध्या मोठ्या प्रमाणात उष्णता वाढली आहे. त्यामुळे अंटार्क्टिकामधील तापमान सरासरीपेक्षा ७० डिग्री सेल्सियसपर्यंत वाढले आहे. आर्क्टिकमध्येही तापमान ५० डिग्रीच्या वर गेले आहे. सध्या अंटार्क्टिकामध्ये ४० तर आर्क्टिकमध्ये ३० डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद केली गेली असून ती सरासरीपेक्षा अनेक पटींनी अधिक आहे. तज्ज्ञांच्या मते अशाच प्रकारे उष्णता वाढत राहिली तर दोन्ही ध्रुवांवर झपाट्याने बर्फ वितळण्यास सुरुवात होईल. या वातावरण बदलाचे कारण शास्त्रज्ञांनाही कळले नाही. परंतु नॅशनल स्नो अँड आइस डेटा सेंटरने इशारा दिला की, अंटार्क्टिका पृथ्वीच्या इतर भागापेक्षा जलद गतीने उष्ण होत आहे. अंटार्क्टिकामध्ये बर्फाच्या रूपाने एवढे पाणी जमा झाले आहे की ते वितळल्यास जगात समुद्राचा जलस्तर २०० फुटांपर्यंत वाढू शकतो. जगातील सखल भाग बुडू लागतील.

अंटार्क्टिका : उष्णतेचा विक्रम
अंटार्क्टिकेच्या कोनकोर्डिया स्टेशनवर सरासरी ७० डिग्री सेल्सियस तापमान अधिक नोंदवले गेले. येथे उष्णतेचे सर्व विक्रम मोडित निघाले. पूर्वी येथे सरासरीच्या २७ डिग्री सेल्सियस अधिक तापमान नोंदवले गेले होते. हे पाहून अमेरिकेच्या नेशनल स्नो अँड आइस डेटा सेंटरचे अधिकारीही चकित झालेत.

बातम्या आणखी आहेत...