आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Extreme Levels Of Flood Danger In China 5 Million People In Crisis In Jiangxi Province, 43,000 Hectares Of Crops Destroyed

चीनमध्ये पुराचा हाहाकार:जिआंगशी प्रांतात 5 लाख लोक संकटात, 43 हजार हेक्टरवरील पिकांची नासाडी

जिआंगशीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

चीनच्या जिआंगशी प्रांतात मुसळधार पाऊस आणि पुरामुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. जिआंगशीच्या 55 प्रांतांमध्ये पाऊस आणि पुरामुळे पाच लाख लोक बाधित झाले आहेत, तर 43,300 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सध्या पाऊस थांबल्याने नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी या प्रांतात पुन्हा पाऊस होण्याचा दावा हवामान खात्याने केला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुरामुळे आतापर्यंत 7 कोटी डॉलर्स इतके थेट नुकसान झाले आहे. त्याचवेळी मान्सून यांगत्से नदीच्या खोऱ्याकडे सरकल्याने पाण्याची पातळी वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. जलविज्ञान केंद्रांनी पाण्याच्या पातळीबाबत रेड अलर्ट जारी केला आहे.

पोयांग तलावाकडे पाण्याची पातळी वाढणार
चीनमधील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर असलेल्या पोयांग सरोवराच्या पाण्याची पातळी येत्या 4 दिवसांत वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीपेक्षा 0.4 मीटरने वाढू शकते, ज्यामुळे परिसरात पूर येऊ शकतो.

मुसळधार पाऊस आणि पूर यांमुळे जिआंग्शीच्या अनेक भागात पाणी तुंबले असून भूगर्भीय आपत्तींना धोका निर्माण झाला आहे.
मुसळधार पाऊस आणि पूर यांमुळे जिआंग्शीच्या अनेक भागात पाणी तुंबले असून भूगर्भीय आपत्तींना धोका निर्माण झाला आहे.

पूर, भूस्खलन आणि पाणी साचण्याचा धोका

दुसरीकडे, जिआंग्शीच्या मध्यवर्ती भागात पूर, भूस्खलन, शहरी आणि ग्रामीण पाणी तुंबणे आणि भूगर्भीय आपत्तींचा धोका आहे. हवामान बदल आणि पूर नियंत्रणासाठी उच्चस्तरीय देखरेख ठेवण्याची मागणी अधिकाऱ्यांनी केली आहे.

आतापर्यंत ८३ हजार लोकांना या परिसरातून हलवण्यात आले आहे. भविष्यात आणखी पावसाचा अंदाज आहे.
आतापर्यंत ८३ हजार लोकांना या परिसरातून हलवण्यात आले आहे. भविष्यात आणखी पावसाचा अंदाज आहे.

पुरामुळे प्रांताचे सुमारे 40 कोटी डॉलर्सचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आतापर्यंत सुमारे 83,000 लोकांना या परिसरातून हलवण्यात आले आहे. स्थानिक अधिकार्‍यांच्या मते, 28 मे पासून मुसळधार पाऊस आणि पुरामुळे राज्यातील 80 प्रांतांमध्ये हाहाकार उडाला आहे