आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:फेसटाइमने अँड्रॉइड युजर्सनाही कॉल शक्य, स्क्रीन शेअर करून सोबत चित्रपट पाहता येईल, हस्तलिखित नोट ई-मेलमध्येही बदलता येणार

वॉशिंग्टन2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अॅपलने लाँच केले आयओएस 15 सॉफ्टवेअर, भारतीय युजर्सच्या सुविधांवर दिले लक्ष

अॅपलने आयफोन, आयपॅड व इतर उपकरणांसाठी आयओएस १५ सॉफ्टवेअर लाँच केले आहे. ते आयफोन ६ एस व त्यानंतरच्या सर्व मॉडेल्समध्ये चालेल. अँड्रॉइड युजर्सशी फेसटाइम कॉल, अॅपल मॅप्स अपग्रेड, नवी नोटिफिकेशन पद्धत, कॅमेऱ्यात लाइव्ह टेक्स्टसारखे फीचर्स यात असतील. भारतीय युजर्सना लक्षात घेऊन डिक्शनरी फीचर अपडेट केले आहे. स्मार्ट रिप्लायमध्ये १० भारतीय भाषा वाढवल्या आहेत. व्हर्च्युअल असिस्टंट सीरीलाही भारतीय भाषांचा सपोर्ट मिळेल. अशाच ही उपयोगी फीचर्सची ही माहिती...

फेसटाइम सर्व युजर्ससाठी
आयओएस युजर्स अॅपलचे फेसटाइम अॅप वापरून अँड्रॉइड युजर्ससोबतही व्हिडिअो कॉलिंग करू शकतील. पूर्वी नव्या शेअर-प्लेने युजर्स मित्रांसोबत सिंक होऊन चित्रपट पाहू शकतील, गाणी एेकू शकतील.

मेसेजवर युजर्सचे नियंत्रण
अज्ञातांकडून पाठवले जाणारे प्रचार व जाहिरातींचे मेसेज आणि नोटिफिकेशन युजर सुरू वा बंद करू शकतील. कॅमेरा अॅपने यूपीआयद्वारे पेमेंटसाठी कोड स्कॅन करता येईल.

लाइव्ह टेक्स्ट
या फीचरद्वारे फोटोतील हस्तलिखित मजकूर ओळखता येईल. हातांनी लिहिलेली नोट थेट ई-मेलमध्ये बदलता येईल. टेक्स्टचा फोटो घेताना तो फोन, ई-मेल वा मेसेजमध्ये बदलण्याचा पर्याय मिळेल.

सीरीला हिंदी-मराठीतही कमांड
सीरी आता तोडकी-मोडकी इंग्रजी, हिंदीसह मराठी, तेलगू, कानडी, तामिळ, गुजराती, बंगाली, पंजाबी व मल्याळममध्येही कमांड घेईल. स्मार्ट रिप्लायमध्ये साथ उर्दू व ओडियालाही जोडले आहे.

फोकस
वैताग देणारे अॅप हाइड करता येईल. नोटिफिकेशन कशा दिसाव्यात, त्यांचे टायमिंग ठरवता येईल. म्हणजे कामात असताना त्या स्नूझिंग मोडमध्ये राहतील. काम संपल्यानंतर या नोटिफिकेशन दिसू लागतील.

डिप्रेशन डिटेक्टर : युजर नैराश्यात वा चिंताग्रस्त असेल तर आयफोनला कळेल
युजर्सच्या मानसिक आरोग्यावर लक्ष ठेवता येईल, असे तंत्रज्ञान अॅपल विकसित करत आहे. कंपनी कॅलिफोर्निया विद्यापीठ आणि बायोटेक फर्म बायोजेनसोबत आपल्या उपकरणांत आरोग्यासंबंधीचे सेन्सर जास्त प्रभावी करण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रकल्पाशी संबंधित सूत्रांनुसार, आयफोनच्या सेन्सरद्वारे गोळा करण्यात आलेल्या डेटाचा वापर मानसिक आरोग्याशी संबंधित डिजिटल संकेतांसाठी केला जाईल. यात चिंता आणि नैराश्याचाही समावेश आहे. चेहऱ्यावरील भाव, बोलण्याची पद्धत, फिरायला जाण्याचा पॅटर्न, निद्रेचा अवधी, हृदयगती व ब्रीदिंग रेटद्वारे युजर्सच्या वर्तणुकीतील बदलांना प्राथमिक संकेत समजले जाईल.

बातम्या आणखी आहेत...