आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

प्रायव्हसी प्रकरण:फेसबुकवर इंस्टाग्रामच्या माध्यमातून डेटा चोरी करण्याचा आरोप, यूजरच्या प्रायव्हेट डेटासाठी फोन कॅमेराचा केला वापर

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • न्यू जर्सीच्या इन्स्टाग्राम यूजर ब्रिटनी कॉन्डिटीने सॅन फ्रान्सिस्कोच्या फेडरल कोर्टात याचिका दाखल केली
  • फेसबुकने त्याचे खंडन केले, त्यानुसार हे सर्व एका बगमुळे झाले आहे

काल रात्री फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर सर्व्हर डाऊन झाल्यामुळे जगभरातील अनेक यूजर्स या प्लॅटफॉर्मवर लॉग इन करू शकले नाहीत. यावर युजर्सनी ट्विटरवरही तीव्र संताप व्यक्त केला. दरम्यान, फेसबुकवर कथितरित्या इन्स्टाग्राम यूजर्सची हेरगिरी केल्याचे समोर आले आहे. यासाठी फेसबुकवर फोन कॅमेरा वापरल्याचा आरोप आहे.

खटल्याच्या मीडिया रिपोर्टनुसार, फोटो शेअरिंग अॅप्स इन्स्टाग्रामवर अॅक्टिव्ह नसतानाही आयफोन वापरकर्त्यांनी त्यांच्या फोनच्या कॅमेर्‍यावर अॅक्सेस असल्याचे दिसून आले. मात्र फेसबुकने या सर्व वृत्तांचे खंडन केले आहे. त्यानुसार, हे सर्व एका बगमुळे झाले आहे.

काय आहे प्रकरण?
सॅन फ्रान्सिस्कोच्या फेडरल कोर्टात गुरुवारी दाखल केलेल्या तक्रारीत न्यू जर्सीचे इन्स्टाग्राम यूजर ब्रिटनी कॉन्डिटी यांनी सांगितले की अॅपचा कॅमेरा हेतुपुरस्सर वापरण्यात आला आहे. हे सर्व वापरकर्त्याचा आवश्यक आणि व्हॅल्यूएबल डेटा गोळा करण्यासाठी केले जाते, अन्यथा कोणीही कॅमेर्‍यावर प्रवेश करू शकणार नाही.

कुठे सुरू आहे खटला?
हे प्रकरण कॉन्डिटी विरुद्ध इंस्टाग्राम, LLC, 20-cv-06534, अमेरिकी जिल्हा न्यायालय, कॅलिफोर्नियाचा उत्तरी जिल्हा (सॅन फ्रान्सिस्को) येथील आहे. तक्रारीनुसार वापरकर्त्याच्या घराचा वैयक्तिक आणि खाजगी डेटा मिळवण्यासाठी हे केले जाते. फेसबुक आणि इन्स्टाग्राम हे करण्यास सक्षम आहेत. मात्र फेसबुकने यासंदर्भात भाष्य करण्यास नकार दिला आहे.

कंपनी कशी देखरेख ठेवते?
जेव्हा आपण फोनमध्ये एखादा अ‍ॅप इंस्टॉल करतो तेव्हा अ‍ॅप उघडण्यापूर्वी काही परवानगी विचारली जाते. ज्यात संपर्क, मीडिया, लोकेशन, कॅमेरा इत्यादींचा समावेश असतो. जेव्हा आपण या सर्वांना परवानगी देतो, तेव्हा अ‍ॅपला डेटामध्ये प्रवेश करण्याचा अधिकार मिळतो. अशा परिस्थितीत, जेव्हा जेव्हा आपल्या फोनचा डेटा चालू असतो, तेव्हा हे अॅप्स चोरी करून आपल्या डेटाचे निरीक्षण करण्यास सुरुवात करतात.

फेसबुक, इन्स्टाग्राम अ‍ॅप्सदेखील अशाच प्रकारे फोन डेटाचे निरीक्षण करतात. ते आपल्या संमतीशिवाय आपल्या फोनच्या कॅमेर्‍यावर देखील प्रवेश करू शकतात कारण आपण आधीपासूनच परवानगी दिली आहे.