आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Facebook Avoids Deliberately Deleting BJP Leaders' 'hate Speech', US Newspaper Questions Facebook's Impartiality

सोशल मीडिया:फेसबुकने भाजप नेत्यांचे ‘हेट स्पीच’ हेतुपुरस्सर हटवण्याचे टाळले, अमेरिकी वृत्तपत्राचा फेसबुकच्या नि:पक्षतेवर सवाल

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमेरिकी वृत्तपत्राचा फेसबुकच्या नि:पक्षतेवर सवाल

अमेरिकेचे वृत्तपत्र द वॉल स्ट्रीट जर्नलने फेसबुकच्या नि:पक्षपातीपणावर सवाल केले आहेत. वृत्तपत्राने दावा केला आहे की, फेसबुकने भाजप नेते व काही गटाच्या ‘हेट स्पीच’ असणाऱ्या पोस्टविरोधातील कारवाईकडे मुद्दाम दुर्लक्ष केले. या पोस्ट हिंसाचार पसरवणाऱ्या होत्या. फेसबुकच्या दक्षिण व मध्य आशियाच्या धोरण संचालक आंखी दास यांनी भाजप नेते टी. राजासिंहविरोधात फेसबुकचे हेट स्पीच नियम लागू करण्यास विरोध केला होता. त्यांना भाजपसोबतचे संबंध बिघडतील व भारतात कंपनीच्या व्यवसायाचे नुकसान होईल अशी भीती होती. टी. राजा तेलंगणातून आमदार आहेत.

वृत्तात म्हटले आहे की, आंखी दास यांनी निवडणूक प्रचारात भाजपला मदत केली होती. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी फेसबुकने म्हटले होते की, त्यांनी पाकिस्तानी सेना, भारतातील राजकीय पक्ष काँग्रेसचे अप्रमाणित फेसबुक पेज व भाजपद्वारे खोटे वृत्त असलेले पेज हटवले होते. मात्र, सिंह आणि भाजप खासदार अनंतकुमार हेगडे यांच्या अनेक फेसबुक पोस्ट तोपर्यंत हटवल्या नाहीत, जोपर्यंत वॉल स्ट्रीट जर्नलने याबाबत इशारा दिला नाही. या सर्व पोस्ट मुस्लिमांबाबत द्वेष असलेल्या होत्या.

विरोध : वृत्तात फेसबुकचेही म्हणने, राजकीय दबावात निर्णय घेतले नसल्याचे सांगितले

डब्ल्यूएसजने फेसबुकचे काही माजी कर्मचारी आणि सध्याच्या कर्मचाऱ्यांच्या वक्तव्याचा हवाला दिला आहे. मात्र, या कर्मचाऱ्यांची नावे दिलेली नाहीत. वृत्तात फेसबुकचे प्रवक्ते अँडी स्टोन यांचेही वक्तव्य आहे. यात म्हटले आहे की, आंखी यांचे निर्णय कोणतीही राजकीय सक्ती नव्हती. हिंसाचार पसरवणाऱ्या पोस्टवर प्रत्येक ठिकाणी सारखीच बंदी आणतो. टी. राजा यांना फेसबुकवर राहू देण्यामागे केवळ हेच कारण नव्हते. वृत्त आल्यानंतर फेसबुकने राजा यांच्या काही पोस्ट हटवल्या.

प्रभाव : भारतात फेसबुकचे सर्वाधिक यूजर्स

> भारत 28 कोटी

> अमेरिका 19 कोटी

> इंडोनेशिया 13 कोटी

> ब्राझील 12 कोटी

> मेक्सिको 8.60 कोटी

संघर्ष : विरोधक म्हणाले- भाजपच्या कह्यात फेसबुक, सरकार म्हणाले- तुम्ही डेटाला शस्त्र बनवले होते

भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतात फेसबुक आणि व्हॉट्सअॅपला चालवतात. ते याद्वारे खोटे वृत्त आणि द्वेष पसरवतात. मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी त्याचा वापर करतात. अखेर, अमेरिकी मीडियाने फेसबुकबाबत सत्य समोर आणले. राहुल गांधी, काँग्रेस खासदार

आपल्या पक्षातील लोकांना प्रभावित न करू शकलेले पराभूत लोक सांगतात की, भाजप-संघाचे जगावर नियंत्रण आहे. निवडणुकीआधी डेटाला शस्त्र करण्यासाठी तुम्हाला केंब्रिज अॅनालिटिका, फेसबुकसाेबत आघाडी करताना रंगेहाथ पकडण्यात आले. रविशंकर प्रसाद, केंद्रीय मंत्री

बातम्या आणखी आहेत...