आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक हे डेटा लीक प्रकरणावरुन पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यावेळी एका लीकरने दावा केला आहे की, तो फेसबुकच्या 50 कोटी वापरकर्त्यांचा फोन नंबर अणि दुसरे अनेक तपशील इंटरनेटवर विनामूल्य उपलब्ध करुन देत आहे. परंतु, यामध्ये वापरकर्ते कोण-कोणत्या देशाचे आहे याची अजून पुष्टी झालेली नाही. भारत देशातील 32 कोटी लोक फेसबुकचा वापर करत असून जगात याची संख्या 2.7 अब्ज यूजर्स याचा वापर करतात.
इस्त्राईल सायबर क्राईम इंटेलीजेंस फर्मचे सहसंस्थापक एलन गलचे म्हणणे आहे की, हा तोच फोन नंबरचा डेटा आहे जो जानेवारी महिन्यापासून प्रसारिस होत आहे. ज्याची रिपोर्ट टेक पब्लिकेशन मदरबोर्ड प्रकाशित केली होती.
फेसबुकचे स्पष्टीकरण- हे डेटा खुपच जुना
गल यांचे म्हणणे आहे की, त्यांनी या ताज्या लीक संबंधात काही डेटा व्हेरिफाई केला आहे. ज्यामध्ये त्यांच्या काही परिचितांचा नंबर समावेश असल्याचे निदर्शनास आले. परंतु, हे फेसबुकचे म्हणणे आहे की, हा डेटा खुपच जुना असून त्याला 2019 मध्ये सुधारणा केली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.