आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:भारतात ‘फेकबुक’ बनले आहे फेसबुक : अंतर्गत अहवाल, प्लॅटफॉर्मवर समाजात द्वेष पसरवणाऱ्या बनावट सामग्रीचा महापूर

न्यूयॉर्क | शीरा फ्रेंकेल/दैवेइ अल्बाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरात फेसबुकवर खोट्या बातम्या आणि चिथावणी देणाऱ्या मजकुराकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतो. परंतु भारतात हा प्लॅटफॉर्म ‘फेकबुक’ (बनावट सामग्रीचे पुस्तक) म्हणून रूप धारण करत आहे. हा निष्कर्ष फेसबुकच्याच सुमारे डझनभर अंतर्गत अहवाल आणि अभ्यासातून काढण्यात आला आहे. हा अभ्यास फेसबुकचे कर्मचारी आणि संशोधकांनी केला आहे. वृत्तसंस्थांच्या जागतिक समूहाने ‘फेसबुक पेपर्स’ नावाने ही माहिती प्रसिद्ध केली आहे. या समूहात ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ही सहभागी आहे. फेसबुकच्या माजी प्रॉडक्ट मॅनेजर फ्रान्सेस हॉजेन यांनी हे अहवाल आणि अभ्यासांचे दस्तऐवज मिळवत त्याआधारे सातत्याने फेसबुकची कार्यसंस्कृती, अंतर्गत त्रुटी आदींशी संबंधित माहिती जमवली. त्यांनी प्रसिद्ध केलेल्या ‘फेसबुक पेपर्स’नुसार भारतात बनावट अकाउंट्सद्वारे खोट्या बातम्या देऊन निवडणुका प्रभावित केल्या जात आहेत. ही माहिती फेसबुकलाही आहे. परंतु ते रोखण्यासाठी फेसबुकने एवढी संसाधने निर्मित केली नाही. असा मजकूर रोखण्यासाठी कंपनीच्या बजेटपैकी ८७% केवळ अमेरिकेत खर्च होतो. फेसबुकच्या प्रवक्त्या अँडी स्टोन यांनीही भारतात विशेष समाजाविरुद्ध फेसबुकद्वारे अपप्रचार केला जात असल्याचे मान्य केले.

असाही मजकूर : विशिष्ट समाजाची जनावरांशी तुलना, महिला अत्याचाराबाबत सल्ल्यांचे दावे एका अंतर्गत दस्तऐवजाचे शीर्षक ‘अॅडव्हर्सेरियल हार्मफुल नेटवर्क्स: इंडिया केस स्टडी’ आहे. यात लिहिले की, भारतात असे अनेक समूह आणि पेज आहेत, ज्यावर प्रक्षोभक सामग्री दिली जाते. विशेष समाजाविरुद्ध वक्तव्ये, प्रचार सामग्री असते. त्या समाजाची तुलना जनावरांशी केली जाते. एका धर्माच्या सामग्रीबाबतही अपप्रचार केला जात आहे. या सामग्रीत दुसऱ्या धर्मातील लोकांचा छळ करणे, त्यांच्या महिलांवर अत्याचार करण्याचा सल्लाही दिला जातो.

भारतीय भाषा, संस्कृती व राजकारणाचे आकलनही नाही
फेसबुकने भारतातील विस्तारापूर्वी येथील २२ मान्यताप्राप्त भाषांचे आकलन केले नाही. येथील संस्कृती, राजकारण आणि त्याच्या प्रभावाविषयी जाणून घेतले नाही. भारतासारख्या मोठ्या देशात कोट्यवधी वापरकर्त्यांना ते कसे सांभाळणार यावरही विचार केला नाही.

फेसबुकला सर्व माहीत आहे, पण कारवाईला घाबरते
फेसबुकला भारतात प्रचारित, प्रसारित आक्षेपार्ह मजकुराविषयी सर्व माहिती आहे. पण ते प्रसारित करणाऱ्या संघटनांवर कारवाई करण्यास घाबरते. कारण अशा बहुतेक संघटना राजकीयदृष्ट्या सक्रिय आहेत. एका धार्मिक संघटनेवर फेसबुकची अनेक दिवसांपासून नजर आहे.

- फेसबुकवर अशाही खात्यांचे वर्चस्व आहे, ज्यात प. बंगाल आणि पाकिस्तानला लागून सीमा भागातील मुस्लिमांच्या वाढत्या लोकसंख्येचा मुद्दा प्रामुख्याने उचलला जात आहे. कथितपणे देशात अवैधरीत्या राहत असलेल्या मुस्लिमांना देशातून बाहेर काढण्याविषयी लिहिले जाते.

- आणखी एक अहवाल ‘इंडियन इलेक्शन केस स्टडी’ नावाने आहे. यात उल्लेख आहे की, प. बंगालशी संबंधित ४० %हून अधिक खाती बनावट किंवा अप्रमाणित आहेत. यातील एका खात्यावर तर ३ कोटींहून अधिक लोक कोणत्या ना कोणत्या रूपाने जोडलेले होते. मार्च-२०२१ च्या एका अहवालात म्हटले की, किती खाती बनावट आहेत, याची फेसबुकला माहिती आहे. पण ती हटवली गेली नाहीत.

बातम्या आणखी आहेत...