आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूमिकेवर प्रश्न:जास्त पैसे कमवायचे म्हणून फेसबुक नेत्यांपुढे नमते आहे; 200 कर्मचाऱ्यांनी लिहिले व्यवस्थापनाला पत्र

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रश्न : कर्मचाऱ्यांना हवे आहे व्यवस्थापनाकडून उत्तर
  • आरोप : कंटेंटवर भक्कम व बड्या नेत्यांच्या अटी मान्य करते
  • चर्चा : कंपनीचे धोरणापेक्षा राजकारणावर जास्त लक्ष आहे

जगभरात हाेत असलेल्या विविध घटना, वाद अाणि अन्य राजकीय प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर फेसबुकच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात अाहे. अाश्चर्याची गाेष्ट म्हणजे हे प्रश्न त्यांच्याच कर्मचाऱ्यांनी उपस्थित केले अाहेत. तु न्यूयाॅर्क टाइम्सला कर्मचाऱ्यांचे अंतर्गत मेल तसेच अन्य संदेशांवरून या गाेष्टी समजल्या अाहेत. कंटेंटच्या बाबतीत फेसबुक व्यवस्थापन हे अाता भक्कम सरकार किंवा नेत्यांच्या पुढे वाकत अाहे. कारण कंपनीला त्यांच्याकडून भरपूर पैसा कमावायचा असल्याचा अाराेप करण्यात अाला अाहे.

भारत सरकारने फेसबुक आणि इतर कंपन्यांना एप्रिलमध्ये कोरोनाशी निगडित कंटेंट काढून टाकण्याचे आदेश दिल्यावर कंपनीने ते लगेच मान्य केले असे एका मेलमध्ये म्हटले अाहे. पंतप्रधान माेदी भारतातील व्यवसायावर बंदी घालतील अशी फेसबुकला भीती हाेती. फेसबुकचे अाता धाेरणापेक्षा राजकारणावर जास्त लक्ष असल्याचे एका कर्मचाऱ्याने म्हटले अाहे.

वाद : व्हॉट्सअॅप धोरणासाठी युजर्सवर दबाव : केंद्र
व्हाॅट‌्सअॅप वाद प्रकरणात केंद्र सरकारने उच्च न्यायालयाला सांगितले की, धाेरण स्वीकारण्यासाठी कंपनी युजर्सवर दबाव अाणत अाहे. त्यासाठी ती अापल्या क्षमतांचा चुकीच्या पद्धतीने वापर करत अाहे. व्हाॅट‌्सअॅप युजर्सला वारंवार नाेटिफिकेशन पाठवत असून ते भारतीय स्पर्धा अायाेगाच्या २४ मार्च २०२१ च्या अादेशाच्या विराेधात अाहे. न्यायालयाने नवीन गाेपनीयता धाेरणाबाबत पाठवण्यात येणाऱ्या नाेटिफिकेशनसंदर्भात अंतरिम अादेश द्यावेत अशी केंद्राने दिल्ली उच्च न्यायालयाकडे मागणी केली अाहे.

वास्तविक १५ मेपासून भारतासह अनेक देशांत व्हाॅट‌्सअॅपच्या गाेपनीयता धाेरणाची अंमलबजावणी करण्यात अाली अाहे. या नव्या गाेपनीयता धाेरणाबाबत सरकारनेदेखील प्रश्न उपस्थित केला अाहे, परंतु त्यात अातापर्यंत काेणताही बदल केलेला नाही. अशा स्थितीत व्हाॅट‌्सअॅप अापले नवे धाेरण युजर्सच्या माथी मारत असून ते स्वीकारण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवत अाहे. दैनिक भास्करशी विशेष करारांतर्गत

बातम्या आणखी आहेत...