आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tech auto
  • Facebook | Meta | Google Meet | The New Name Clarifies Facebook's Purpose; Zoom Meetings Will Be Replaced By Metavers, A Battle For Investment In Tech Companies

डिजिटल क्रांती:नव्या नावामुळे फेसबुकचे उद्दिष्ट स्पष्ट; झूम मीटिंग्जची जागा घेईल मेटाव्हर्स, गुंतवणुकीसाठी टेक कंपन्यांत चढाओढ

न्यूयॉर्क | मोहंमद अली11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिलिकॉन व्हॅलीत पुढील युद्ध ‘मेटाव्हर्स’वर लढले जाईल याचीच चर्चा सध्या कॅलिफोर्नियात आहे. मेटाव्हर्स आपले व्हर्च्युअल आयुष्य बदलून टाकेल, असे प्रत्येक मोठ्या टेक कंपनीचे मत आहे. कोरोनामुळे शाळा व कार्यालयच नव्हे तर प्रत्येक जागी विस्तारलेल्या व्हर्च्युअल जगामुळे याची खात्री पटते. प्रत्येक मोठी टेक कंपनी मेटाव्हर्समध्ये गुंतवणुकीच्या शर्यतीत धावत आहे.

त्यात सर्वाधिक गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांत बहुतेक फेसबुकचे नाव सर्वात आधी आहे. कंपनीच्या एका वरिष्ठ कर्मचाऱ्याने सांगितले की, मार्क झुकेरबर्गने वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत मेटाव्हर्सवर सर्वाधिक चर्चा केली आहे. आता ही आयडिया स्टार्ट-अप्स, व्हेंचर कॅपिटलिस्ट्स व टेक कंपन्यात सर्वाधिक लोकप्रिय होत आहे. फेसबुकचे नावे नाव ‘मेटा’मुळे कंपनीचा फोकस आता कुठे आहे, हे स्पष्ट झाले आहे.

फेसबुकचे तज्ज्ञ सांगतात, सोप्या शब्दांत मेटाव्हर्स म्हणजे, ही एक अशी स्पेस तयार करण्याची तयारी आहे जी इंटरनेटसारखीच असेल. मात्र एका स्क्रीनवर सर्वकाही पाहण्याऐवजी तुम्ही तुमच्या डिजिटल अवताराच्या माध्यमातून या जगात प्रवेश करू शकाल व इतर लोकांना याच जगात समाेरासमोर भेटू शकाल.

आज झूम वा अशाच इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवर होणाऱ्या मीटिंग्ज आपल्या आयुष्याचा एक भाग बनल्या आहेत. मात्र आता तुम्हाला कल्पना करता येईल की एका बोअरिंग स्क्रीनवर एखाद्याला बोलताना पाहण्याऐवजी तुम्ही मेटाव्हर्सच्या माध्यमातून व्हर्च्युअल कॉन्फरन्स रूममध्ये पसंतीच्या रंगरूपात मीटिंगमध्ये सहभागी होऊ शकाल.

यामुळे मीटिंगचा अनुभव जास्त वास्तविक असेल. आपण जसे एकमेकांशी समाेरासमोर बोलतो, तसेच तुम्हाला तुमच्या डिजिटल अवताराच्या माध्यमातून बोलता येईल. हा डिजिटल अवतारही आपल्या आवडीनिवडीनुसार तयार करता येईल. तुमच्या ऑनलाइन हालचाली व व्हर्च्युअल रिअॅलिटीचे (व्हीआर) हे सारखेच रूप आहे. मेटाव्हर्सशी कनेक्ट होण्यासाठी तुम्हाला एक युनिक हेडसेटची गरज असेल. घरात हेडसेट घालून तुम्ही ज्या काही हालचाली कराल मेटाव्हर्स त्या तुमच्या डिजिटल अवतारातही होतील. व्हर्च्युअल फळ्यावर लोक या मीटिंग्जमध्ये फोटो व प्रेझेंटेशनही शेअर करू शकतील.

फेसबुकमध्ये होरायझन वर्करूम्स अॅपचे सध्या सुरू आहे अंतर्गत टेस्टिंग

मेटाव्हर्सची संकल्पना शाळेच्या दिवसांपासूनच मनात होती, असे झुकेरबर्गने म्हटलेले आहे. कंपनीचा सर्वाधिक फोकस मेटाव्हर्सवर असेल. त्याचे संकेत त्याने दिलेले आहेत. फेसबुकचे नाव ‘मेटा’ करून त्याने एक प्रकारे याची घोषणाच केली आहे. फेसबुक ऑक्युलस क्वेस्ट-२ हेडसेट घेणाऱ्यांसाठी होरायझन वर्करूम्स अॅप लाँच करेल. कंपनीने २०१६ व २०१७ मध्ये ऑक्युलस रूम्स व फेसबुक स्पेसेस ही अशीच अॅप्स लाँच केली. मात्र ती २०१९ मध्ये बंद केली. होरायझन वर्करूम्स अॅपचे सध्या अतंर्गत टेस्टिंग सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...