आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रम्पविरुद्ध फेसबूकची कारवाई:आधी ट्विटरने केले बॅन आता फेसबूक अकाउंट 2 वर्षांसाठी बंद; भडकाऊ पोस्टवरून ट्रम्प यांच्याविरुद्ध फेसबूकची कारवाई

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे फेसबूक अकाउंट दोन वर्षांसाठी बंद करण्यात आले आहे. 7 जानेवारी 2021 पासून पुढील दोन वर्षे त्यांना फेसबूक वापरता येणार नाही. याच दिवशी ट्रम्प यांचे अकाउंट पहिल्यांदा सस्पेंड करण्यात आले होते. फेसबूकचे व्हीपी (ग्लोबल अफेअर्स) निक क्लेग यांनी शुक्रवारीच यासंदर्भातील माहिती जारी केली.

फेसबूकने केलेल्या कारवाईनुसार, आता ट्रम्प यांचे अकाउंट 7 जानेवारी 2023 पर्यंत सस्पेंड राहील. अर्थातच त्यांना नोव्हेंबर 2022 मध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीत सुद्धा सोशल मीडियाचे हे अकाउंट वापरता येणार नाही. या कारवाईचा ट्रम्प यांनी तीव्र निषेध केला आहे. दरम्यान, एक्सपर्टशी चर्चा करून ट्रम्प यांचे फेसबूक अकाउंट सुरू करण्यावर विचार केला जाईल. परंतु, त्यांच्या फेसबूक खात्यामुळे समाजात तेढ किंवा वाद निर्माण होऊ नये. शांतता भंग होऊ नये याची देखील काळजी घेतली जाईल असे फेसबूकच्या वतीने सांगण्यात आले आहे.

हा तर 7.5 कोटी मतदारांचा अपमान -ट्रम्प
फेसबूकने केलेल्या कारवाईनंतर ट्रम्प यांनी यास 7.5 कोटी मतदारांचा अपमान म्हटले आहे. 2020 मध्ये मला कोट्यधी लोकांनी मतदान केले होते. फेसबूकने कारवाई करून त्या सर्वांचा अपमान केला. आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न यशस्वी ठरणार नाही. आम्ही पुन्हा जिंकू. आमचा देश अशा पद्धतीचा अपमान सहन करणार नाही असेही ट्रम्प म्हणाले आहेत.

ट्विटरने आधीच केले नेहमीसाठी बॅन
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीनंतर 6 जानेवारी रोजी कॅपिटल हिलमध्ये हिंसाचार घडला. ट्रम्प यांनीच आपल्या समर्थकांना भडकावले होते असा आरोप आहे. यानंतर 7 जानेवारी रोजी फेसबूकने सुद्धा तात्पुरती कारवाई केली होती. फेसबूकने इंस्टाग्राम आणि गुगल प्लॅटफॉर्म यू-ट्यूबने सुद्धा ट्रम्प यांचे अकाउंट निलंबित केले होते. या कारवाईनंतर ट्रम्प म्हणाले होते, की पुढच्या वेळी सोशल मीडिया कंपन्यांच्या बड्या अधिकाऱ्यांना त्यातही प्रामुख्याने फेसबूक सीईओ मार्क झकरबर्ग आणि त्यांच्या पत्नीला व्हाइट हाउसमध्ये डिनर देणार नाही. ट्रम्प यांना फेसबूक वापरू देण्यात धोका असल्याचे मार्क म्हणाले होते.

बातम्या आणखी आहेत...