आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अमेरिकेत ३ नोव्हेंबरला राष्ट्राध्यक्ष निवडणूक होणार आहे. यावर फेसबुक अमेरिकी मतदात्यांना जागरूक करण्यासाठी आणि त्यांना अधिकृत माहिती देण्यासाठी एक अभियान सुरू करणार आहे. फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी स्पष्ट केले की, ‘अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प किंवा जगातील कोणत्याही नेत्याला चुकीची माहिती प्रसारित करण्यापासून फेसबुक रोखणार नाही. त्यांनी शेअर केलेल्या पोस्टही हटवणार नाही.’
ते पुढे म्हणाले, ‘ज्यांना नकोशा वाटत असतील त्यांना राजकीय जाहिराती बंद करता येतील, अशी सुविधा आम्ही वापरकर्त्यांना देणार आहोत.’ दुसरीकडे फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर एक ‘व्होटिंग इन्फर्मेशन सेंटर’ सुरू करण्यात येणार आहे. यात मतदार नोंदणीबाबत माहिती, मतदान केंद्रांची यादी आणि ई-मेलवरून मतदान कसे करता येईल, याची माहिती देण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले.
नेत्यांना जबाबदार धरण्याचा मतदान हा सर्वोत्तम मार्ग
झुकेरबर्ग यांनी अमेरिकेच्या एका वृत्तपत्रात लिहिले की, ‘नेत्यांना जबाबदार धरण्यासाठी मतदान हा सर्वात चांगला मार्ग आहे. मतदारांनी स्वत:चा निर्णय स्वत:च घेतला पाहिजे. त्यामुळे मतदारांचा सहभाग वाढवण्याचा महत्त्वाकांक्षी प्रयत्न करताना आपले व्यासपीठ लोकांच्या अभिव्यक्तीसाठी होईल तेवढे खुले राहिले पाहिजे, असा आमचा प्रयत्न आहे.’
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.