आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडिया कंपनी:फेसबुकची लोकप्रियता घसरणीला! गोपनीय दस्तऐवजातील माहितीचा ​​​​​​​ गौप्यस्फाोट, कंपनीला मान्य

21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोशल मीडिया कंपनी फेसबुकला आतापर्यंत अतिशय शक्तिशाली मानले जात हाेते. परंतु फेसबुकच्या लोकप्रियतेत सातत्याने घसरण होत असल्याचे दिसून आले आहे. अमेरिकेतील तरुणांना आता फेसबुकमध्ये फार रस राहिलेला नाही. तूर्त कंपनीसमोर आर्थिक संकट नसले तरी आगामी काळात कंपनीला समस्यांना तोंड देण्याची वेळ येऊ शकते, असा गाैप्यस्फोट एका अंतर्गत अहवालात करण्यात आला आहे.फेसबुकमध्ये अंतर्गत द्विस्तरीय निगराणी व मूल्यमापनाची यंत्रणा आहे. कंपनीला या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. कोराेनाकाळात चुकीच्या माहितीमुळे फेसबुकला फटका बसल्याचे मानले जाते. आता फेसबुकची कंपनी इन्स्टाग्रामवर बाॅडी इमेजचा मुद्दा आणखी नाराजी वाढवणारा ठरला आहे. जगभरातील अनेक देशांत फेसबुकला सरकारच्या नाराजीला देखील तोंड द्यावे लागत आहे.

अमेरिकेत फेसबुकच्या विरोधात अनेक खटले चालवले जात आहेत. कंपनीतील उच्चपदस्थ अधिकारीही खुलेपणाने आपले म्हणणे मांडू लागले आहेत. अमेरिकन सिनेटच्या अलीकडे झालेल्या सुनावणीत फेसबुकच्या ग्लोबल सेक्युरिटी प्रमुख अँटीगाेन डेव्हिसच्या खासदारांनी ग्राहकांच्या सुरक्षेबाबत मोठ्या प्रमाणात टीका केली. फेसबुककडून आपल्या प्रतिमेत सुधारणा करण्यासाठी मोठ्या पातळीवर प्रयत्न केले जात नाहीत. लहान मुलांचे इन्स्टाग्राम अॅप आणणे आणि पुन्हा लोक अमेरिकन सरकारच्या विरोधामुळे ते मागे घेण्याचा निर्णय फेसबुकला घ्यावा लागला.अनेक देशांत सोशल मीडियावर बंदी आहे. काही सरकारांनी तर केवळ सरकारी मीडियालाच देशात परवानगी दिली आहे. त्यात उत्तर कोरियासारख्या देशांचा समावेश होतो. सोशल मीडियामधून सरकारच्या विराेधातील मतप्रदर्शन अनेकवेळा या क्षेत्रातील कंपन्यांसाठी अडचणीचे ठरते.

सुरक्षेकडे कानाडाेळा, केवळ नफ्याचा विचार
आतापर्यंत शाॅन नावाने पडद्याआड राहिलेली व्हिसलब्लाेअरने आपली आेळख जाहीर केली आहे. फेसबुकच्या प्राॅडक्ट मॅनेजर राहिलेल्या फ्रान्सिस हाउगन यांनी सनसनाटी खुलासा केला आहे. साेशल मीडिया कंपनी फेसबुकने वारंवार खासगीपणा, सुरक्षेकडे दुर्लक्ष करून नफ्यावर लक्ष केंद्रित केले. किशाेरवयीन मुलांसाठी इन्स्टाग्राम आणल्याने काय परिणाम हाेतील, याची फेसबुकला पूर्ण कल्पना हाेती, असा आराेपही त्यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...