आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Facebook's Survey User Said The Most Visible Content Is The Worst For The World; Finally Zuckerberg Brought The Sort

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:फेसबुकच्या सर्व्हेत युजर म्हणाले- सर्वाधिक दिसणारा कंटेंट जगासाठी सर्वात वाईट; अखेर झुकेरबर्ग यांनी आणली क्रमवारी

सॅन फ्रान्सिस्को2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आक्षेपार्ह, दिशाभूल करणाऱ्या मजकुरामुळे फेसबुकवर बदल करण्यासाठी दबाव

केविन रूज, माइक आयसेक, शिरा फ्रँकल
फेसबुकवर चुकीची माहिती देणे व आक्षेपार्ह वक्तव्यास चालना देण्याचे आरोप होत आहेत. मात्र, झुकेरबर्गला त्याच्याशी देणेघेणे नाही. मात्र, फेसबुकच्याच एका सर्व्हेने त्यांना आरसा दाखवला आहे. कंपनीने त्यांच्या युजर्ससाठी एक सर्व्हे केला की, फेसबुकच्या बहुतांश पोस्टला ते जगासाठी चांगले मानतात की वाईट. बहुतांश युजर म्हणाले, फेसबुकवर सर्वाधिक दिसणारा मजकूरच जगासाठी सर्वात वाईट असतो.

सर्व्हेच्या निकालांनी फेसबुकला धक्का बसला. खरे म्हणजे कंपनीच्या धोरणांशी तडजोड न करता खोटी माहिती कशी कमी करता येईल यासाठी फेसबुकची टीम झगडत आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीनंतर झुकेरबर्ग व फेसबुकच्या कर्मचाऱ्यांची निवडणुकीसंदर्भात खोट्या बातम्या व्हायरल होण्याबाबत बैठक झाली. टीमने न्यूज फीड करण्याच्या अल्गोरिदममध्ये बदल करण्याचा प्रस्ताव दिला. झुकेरबर्गही त्याला तयार झाले. यात सिक्रेट इंटर्नल रँकिंगची न्यूज इकोसिस्टिम क्वालिटी लागू करण्यात आली. यातून बातमी प्रसारित करणाऱ्याला त्यांच्या मजकुराच्या गुणवत्तेवरून क्रमवारी दिली जाते. एका कर्मचाऱ्यानुसार हा बदल फेसबुकच्या ‘ब्रेक ग्लास’ योजनेचा भाग आहे. त्यानंतर फेसबुकवर सीएनएन, न्यूयॉर्क टाइम्स व एनपीआरसारख्यांचा मजकूर वाढला, तर चुकीची माहिती पसरवणाऱ्या उजव्या विचारसरणीचा मजकूर कमी झाला.

युजर कोणत्या पोस्टला वाईट म्हणू शकतो याबाबत पूर्वानुमान लावणारा अल्गोरिदम फेसबुकने मशीन-लर्निंगद्वारे तयार केला. यातून अशा पोस्टला चालना मिळत नाही. यामुळे सुरुवातीला आक्षेपार्ह मजकूर कमी करण्यात यश आले. मात्र, यामुळे लोक फेसबुकवर येण्याचे प्रमाणही कमी झाले. फेसबुकच्या एका अधिकाऱ्यानुसार, परिणाम चांगला होता, मात्र सेशन्स घटले. यानंतर दुसऱ्या योजनेवर काम करण्यात आले. असे बदल कायमचे लागू करावेत असे फेसबुकच्या कर्मचाऱ्यांना वाटते.

युजरची खासगी माहिती लीक, फेसबुकला ४५ कोटी रु. दंड
सेऊल | दक्षिण काेरियाने फेसबुकला ४५ कोटी रुपये (६.१ मिलियन डाॅलर) दंड ठोठावला आहे. देशातील खासगी माहितीचे संरक्षण करणाऱ्या पर्सनल इन्फर्मेशन प्रोटेक्शन कमिशनने म्हटले आहे की, मे २०१२ ते जून २०१८ दरम्यान फेसबुकने देशातील १.८ कोटीपैकी ३३ लाख युजर्सची माहिती त्यांच्या परवानगीशिवाय इतर आॅपरेटरांना दिली. फेसबुकच्या लाॅगइनद्वारे दुसऱ्या एखाद्या ऑपरेटरची सेवा वापरल्यास युजरच्या फेसबुक फ्रेंड्सची खासगी माहिती फेसबुकने त्या ऑपरेटरला दिली होती.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser