आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दडपशाही:इराणमध्‍ये  महिलांचे  चेहरे, शरीरावर सुरक्षा दलाकडून पॅलेट्सचा मारा

एजेंसी | तेहरान4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इराणमध्ये सरकारविरोधी आंदोलन करणाऱ्या महिलांविरुद्ध दमनचक्र सुरू आहे. जखमी आंदोलकांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दावा केला की, सुरक्षा दलांनी जाणीवपूर्वक महिलांचा चेहरा आणि गुप्तांगावर पॅलेटनगने छर्रे डागले जात आहेत. अशा प्रकारच्या जखमा दीर्घकाळपर्यंत राहतात, यासाठी असे केले जात आहे. पॅलेटगनेद्वारे साेडलेले छर्रे प्लास्टिक आणि धातूतून तयार होतात. अनेक डॉक्टर्स आणि परिचारिका लपून आंदोलकांवर उपचार करत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, पुरुष आणि महिलांतील जखमांत बराच फरक आहे. पुरुषांच्या हातापायाशिवाय पाठीवर जखमा आहेत. या उलट महिलांच्या चेहऱ्यावर आणि गुप्तांगावर जखमा केल्या जात आहेत. इस्फहान राज्यातील एक डॉक्टर म्हणाले, महिलांच्या चेहऱ्यावर छर्रे यासाठी डागले जात आहेत की, त्यांचे सौंदर्य नष्ट व्हावे. मी नुकताच एका २० वर्षीय मुलीवर उपचार केले. तिच्या प्रायव्हेट पार्टवर पॅलेटगनने १२ छर्रे मारले होते. यापैकी दोन छर्र्याची मोठी जखम झाली. तरुणीस संसर्गाचा धोका वाढला. स्थिती अशी की, लाज वाटत असल्याने अनेक महिला उपचार करूनही घेत नाहीत. बंदर शहर अब्बासच्या एका विद्यार्थीनीच्या उजव्या डोळ्यात छर्रा मारला.

आंदोलन तीव्र करण्याची तयारी, सरकारही आक्रमक भूमिका घेतेय क्रौर्य : दावा- ११ लोकांना मृत्युदंड दिला, ८० जणांना फाशी सुनावली सामाजिक कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत कमीत कमी ११ लोकांना फाशी दिली आहे. मानवी हक्क गटांच्या दाव्यानुसार, विरोधी आंदोलनांवर सुरक्षा दलांच्या क्रूर कारवाईत ६० मुलांसह ५०० हून अधिक लोक मारले गेले. १८ हजार लोकांना ताब्यात घेतले आहे. ८० आंदोलक फाशीच्या शिक्षेचा सामना करत आहेत. गुरुवारी झालेल्या फाशीनंतर आंदोलन आणखी तीव्र होत आहे.

धमकी : पोलिस म्हणाले - आतापर्यंत संयम दाखवला, आता कठोर होऊ इस्लामिक रिपब्लिकचा कायदा अंमलबजावणी दलाचे कमांडर-इन-चीफ हुसेन अश्तरी म्हणाले, पोलिसांनी आंदोलकांवर आतापर्यंत संयम दाखवला. मात्र, आता कठोरपणे कारवाई करू. १६ सप्टेंबर ते २ डिसेंबरदरम्यान इराणमध्ये सरकारविरोधात विक्रमी १६४१ आंदोलने झाली. या उलट चीनमध्ये लॉकडाऊनविरोधात होणाऱे आंदोलन तेथील जिनपिंग सरकारने दाबले होते.

बातम्या आणखी आहेत...