आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासेेल्फीचा वापर वाढू लागला आहे. लोक दरवर्षी सरकारी ४५० सेल्फी घेतात. परंतु या सवयीमुळे चेहरा बिघडू शकतो असा निष्कर्ष एका अध्ययनातून समोर आला आहे. टेक्सास साऊथवेस्टर्न मेडिकल सेंटरच्या संशोधनात अनेक तथ्ये उजेडात आली. सेल्फी तुमच्या चेहऱ्याला विद्रूप करू शकते. सेल्फीमुळे तुमचे नाक सामान्य छायाचित्राच्या तुलनेत सेल्फीत जास्त लांबट, पसरट दिसू लागते. ब्रिटनमध्ये नाकावर शस्त्रक्रिया केली जाते. त्यास रायनोप्लास्टी असे म्हटले जाते.
कॉस्मेटिक सर्जरीमधील ही सर्वात लोकप्रिय रूपांपैकी अशी शस्त्रक्रिया मानली जाते, असे संशोधकांनी म्हटले. सेल्फी लोकप्रिय असतानाच रायनोप्लास्टी करणाऱ्यांची संख्याही वाढत चालल्याचे दिसते. संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. बर्दिया अमिरलाक म्हणाले, सेल्फी छायाचित्रे व रायनोप्लास्टी यांच्यात एक विशेष संबंध दिसून येतो. सेल्फीचा प्रभाव चेहऱ्यावरील कोणत्या वैशिष्ट्यांवर जास्त प्रमाणात दिसून येतो हे जाणून घेण्यासाठी संशोधन प्रकल्पात ३० स्वयंसेवकांना सहभागी करण्यात आले होते. स्वयंसेवकांनी तीन सेल्फी घेतल्या. त्यापैकी दोन १२ व १८ इंच लांबून सेल्फी घेण्यात आल्या. एक छायाचित्र पाच फूट लांबीवरून डिजिटल कॅमेऱ्याने घेण्यात आले. तिन्ही छायाचित्रे एकाच वेळी व एकाच प्रकाशात घेण्यात आली होती. त्यावरून सेल्फीचे धोके देखील समोर आले आहेत.
इशारा : सेल्फीतील चेहऱ्यावरील विकृतीमुळे मानसिक आरोग्याला बिघडणे शक्य
डिजिटल कॅमेऱ्याने घेतलेल्या छायाचित्राच्या तुलनेत १२ इंच व १८ इंचावरून घेतलेल्या सेल्फीतील नाक अनुक्रमे ६.४ टक्के लांब व ४.३ टक्के जास्त लांबीचे दिसते. १२ इंची कॅमेऱ्यामुळे हनुवटीची लांबीही १२ टक्के घटल्याचे दिसून आले. त्यामुळे नाक व हनुवटी यांच्यातील प्रमाण १७ टक्के वाढल्याचे दिसले. सेल्फीने चेहऱ्यांच्या रुंदीच्या मानाने नाकाला जास्त पसरट दाखवले. म्हणून चेहऱ्यावरील विकृती मानसिक आरोग्य बिघडवू शकते, असा इशारा संशोधकांनी दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.