आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजपानमध्ये लोकांची धर्मावरील श्रद्धा सातत्याने घटत आहे. त्यासाठी विश्लेषक धार्मिक समूहांना देशातील राजकीय जगाशी जोडणाऱ्या अनेक घटना आणि घोटाळ्यांना दोष देत आहेत. टोकियोतील त्सुकीजी होंनागजी मंदिरात या वर्षी झालेल्या सर्वेक्षणात सुमारे १,६०० लोकांना विचारले की, त्यांच्या धर्मावरील श्रद्धेत काही बदल आला का? त्यात हैराण करणारी बाब म्हणजे, ३९.७% नी सांगितले की, त्यांचा धर्माप्रति विश्वास आधीपेक्षा कमी झाला आहे. १८ ते ४९ वयाच्या सर्वात जास्त महिला धर्माप्रति नकारात्मक भूमिका अंगिकारत आहेत. सुमारे ५०% महिला म्हणाल्या की, धर्मावरील त्यांचा विश्वास अाधीपेक्षा कमी झाला आहे.
सुमारे ३५% नी हेही सांगितले की, सामान्यपणे धर्माप्रति त्यांची भावना अडचणीची वाटते. मात्र, बौद्ध धर्माबाबत विचारल्यावर केवळ १०% लोकांनीच असे मत व्यक्त केले. जपानमध्ये जवळपास ६७% बौद्ध आहेत. शिंटोवाद दुसरा सर्वात मोठा धार्मिक समूह आहे. यानंतर ख्रिश्चन धर्म आहे. ६० पेक्षा कमी वयाचे बहुतांश पुरुष आणि महिलांना वाटते की, त्यांच्याकडे बौद्ध विहारात जाण्याचे कोणते कारण नाही. १९९० च्या दशकाच्या मध्यात सर्वनाश पंथ ओम शिनरिक्यो प्रमुख गुन्हेगारी प्रकरणांच्या एका मालिकेचा केंद्र बिंदू होता. त्यादरम्यानधार्मिक संघटनांत जपानी लोकांचा विश्वास डळमळीत झाला होता.
युनिफिकेशन चर्चची घुसखोरी अॅबेंच्या हत्येतून समोर
प्रा. हिरोमी मुराकामी म्हणाले, माजी पीएम शिंजो अॅबे यांची हत्या एक ट्रॅजडी होती. मात्र, या घटनेने जपानी लोकांना जागे करण्याचे काम केले. यूनिफिकेशन चर्चने जपानी राजकारणात किती खोलवर घुसखोर केली याची जाणीव त्यांना झाली. वासेदा विद्यापीठातील प्रा. तोशिमित्सु शिगेमुरा म्हणाले, ओम शिनरिक्योसारखे समूह धोक्यांमुळे भयभीत होते. मात्र, चर्चच्या खुलासा हैराण करणारी बाब ठरली. लोकांनी धर्माकडे दुर्लक्ष केल्यास कोमिटोसाठी समस्या होऊ शकते. एलडीपीसोबतच्या सत्तेत कनिष्ठ पक्षाला सोक्का गक्कई धार्मिक समूहाचे समर्थन आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.