आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

तैवानमध्ये फेक फ्लाइट प्रोग्राम:प्रवासी करू शकतील चेक इन, बोर्डिंग पासही मिळेल; विमानात बसू शकतील, पण शहर साेडण्यास मनाई!

तैपेईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • महामारीने देश साेडण्यास आसुसलेल्या लाेकांना मानसिक दिलासा देण्यासाठी अनाेखी क्लृप्ती
Advertisement
Advertisement

काेराना व्हायरसमुळे अनेक देशांंत अजुनही विमान प्रवासावर बंदी आहे. फिरण्यासाठी आतुर झालेल्यांची मानसिकता लक्षात घेऊन तैवानमध्ये फेक फ्लाईट प्राेग्रॅम सुरू करण्यात आला आहे. तैपेईच्या साेंगशान विमानतळावर गुरुवारी पहिल्याच दिवशी ६० लाेकांनी याचा आनंद घेतला. त्यासाठी लाेकांना विमानतळावर जाऊन चेक इन करावे लागेल, पासपाेर्ट व सुरक्षा तपासणी केल्यानंतर बाेर्डिंग पास देण्यात येईल. त्यानंतर लाेक विमानात बसूही शकतात. एअरबस ए ३३० विमानातील अटेंडंट प्रवाशां गप्पा मारतात, त्यांची मदत करतात. विमानात नाष्टाही दिला जाताे. विमानात बसण्यासाठी आराेग्य प्रमाणपत्राची आवश्यकता असते.

७,००० लाेकांचा अर्ज, साेडतीमध्ये निवड झाल्यावरच करू शकतात फेक प्रवास

हा कार्यक्रम जुलै महिन्यासाठीच फक्त सुरू केला आहे. त्यासाठी स्थानिक आणि काेराेनामुळे अडकून पडलेल्या जवळपास ७ हजार पर्यटकांनी अर्ज केला आहे. साेडतीच्या आधारावरच लाेकांना या कार्यक्रमात सहभागी हाेेण्याची परवानगी आहे. ३८ वर्षांचे सिआआे चुन वेई म्हणाले, आम्ही देश साेडून जाऊ शकत नाही, पण त्याचा अनुभव तरी घेऊ शकताे. ते आपल्या मुलाला घेऊन आले हाेते. ४८ वर्षांची साई म्हणाली, ही महामारी संपेल तेव्हा आम्ही प्रत्यक्षात जग फिरू शकू ही त्याची तयारी करण्यासारखेच आहे. या कार्यक्रमातून साेंगशान विमानतळ पयर्टकांना काेराेनाला राेखण्यासाठी काय उपाययाेगना कराव्यात हेही सांगत आहे. या विमानतळावरून जपान आणि चीन देशांत विमाने जातात.

Advertisement
0