आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:अमेरिकेत चीनची बनावट उत्पादने, 8 लाख रुपयांची ब्रँडेड पर्स मिळतेय 16 हजार रुपयांत

न्यूयॉर्कएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोणत्याही ब्रँडेड वस्तूंची बनावट उत्पादने बनवणे हा चीनचा जुना खेळ आहे. परंतु एक दशकात लेडीज पर्सची तंतोतंत नक्कल बाजारात आल्याने अमेरिकेच्या ब्रँडेड कंपन्या त्रस्त झाल्या आहेत. त्यांची गुणवत्ता इतकी चांगली असते की, कस्टम विभागाची नजरही त्यातील फरक ओळखू शकत नाही.

मोठमोठ्या शोरूम्सच्या मालकांची अनुभवी नजरही धोका खात आहे
इंटरनॅशनल अँटी-काउंटरफीटिंग कोलिशनचे अध्यक्ष बॉब बर्चिसी यांच्या मते, ही आता अमेरिकेत मोठी समस्या बनली आहे. १० हजार डॉलर (८ लाख) आणि २०० डॉलरच्या (१६ हजार) पर्समधील फरक कळत नाही. पर्स शनॅल, कोच, गूची, प्राडा कोणत्याही ब्रँडची असेना, बाजारात त्यांची नक्कल खूप कमी दरात उपलब्ध आहे. अमेरिकेतील लक्झरी मालाच्या प्रमाणीकरण प्रक्रियेवर देखरेख करणारे हंटर थॉम्पसन म्हणतात की, बनावट वस्तूंचा व्यवसाय इतका वाढला आहे की, हिवाळ्यात लक्झरी वस्तू बाजारात आणल्या तर त्याच हंगामात बनावट वस्तूंचे आगमन होते.

अमेरिकेत काही लोक याचा लाभही उठवत आहेत. २०१६ मध्ये व्हर्जिनियातील एका महिलेला ४ लाख डाॅलरची डिझायनर पर्स खरेदी केल्याबद्दल आणि सारखीच बनावट पर्स परत केल्याबद्दल शिक्षा सुनावण्यात आली. तिने मूळ पर्स चढ्या दराने विकली होती. रिअ‍ॅलिटी शो ‘रिअल हाऊसवाइव्हज’ स्टार जेन शॉ हिला गेल्या वर्षी टेलिमार्केटिंग फसवणूक केल्याबद्दल दोषी ठरवण्यापूर्वी पोलिसांनी तिच्या घरी छापा टाकला तेव्हा लुई व्हिटॉनची अनेक बनावट उत्पादने सापडली.