आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोलोराडो:प्रसिद्ध फूड चेनचे आऊटलेट सुरू; बर्गरसाठी 4 किमी रांग, 14 तासांची प्रतीक्षा....

डेन्व्हर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 70 वर्षे जुन्या कंपनीच्या 6 राज्यांत आउटलेट

छायाचित्र अमेरिकेतील काेलाेराडाेचे आहे. पण वाहतूक ठप्प झाल्याचे हे चित्र नाही. या कारमध्ये बसलेले लाेक आपल्या पसंतीचा बर्गर खाण्यासाठी ४ किमी लांबीच्या रांगेत लागलेले आहेत. काेलाेराडाेमध्ये शनिवारी अमेरिकेतील प्रसिद्ध फूड चेन ‘इन अॅन आउट’ हे खवय्यांचे आवडते आऊटलेट सुरू झाले. ही खाद्यवार्ता कानी पडताच रात्री दाेनपासून खवय्यांची अशी झुंबड उडाली हाेती. मग काय, कारमुळे रांग चार किलाेमीटरपर्यंत लागली हाेती. पहिला बर्गर केन विज्जी नावाच्या व्यक्तीला देण्यात आला. मी मूळचा कॅलिफाेर्नियाचा आहे. रात्री मला खूप भूक लागली हाेती. म्हणून स्टाेअरच्या रांगेत कार उभी केली आणि तेथे झाेपलाे, असे केनने सांगितले.

७० वर्षे जुन्या कंपनीच्या ६ राज्यांत आउटलेट :

इन अॅन आउट ही ७० वर्षांची परंपरा असलेली कंपनी आहे. अमेरिकेतील ६ राज्यांत कंपनीचे आउटलेट आहेत. कॅलिफाेर्निया, नेवाडा, अॅरिझाेना, यूटा, टेक्सास, ओरेगन या राज्यांचा समावेश हाेताे. काेलाेराडाेमधील हा सातवा आउटलेट आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser