आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दिव्य मराठी विशेष:शेतकरी पुत्र सुगा होतील जपानचे नवे पंतप्रधान; भारतासोबतचे संबंध अधिक चांगले होतील, दोघे मिळून चीनचा सामना करतील

टोकियोहून भास्करसाठी ज्युलियन रोल12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नवे पंतप्रधान युशीहिदे सुगा परराष्ट्र धोरणात आबे यांच्या मार्गदर्शनात करतील काम

शेतकऱ्याचे पुत्र युशीहिदे सुगा जपानचे नवे पंतप्रधान असतील. त्यांनी सोमवारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाच्या (एलडीपी) निवडणुकीत विजय मिळवला. मतदानात पक्षाचे ५३४ खासदार सहभागी झाले. यात सुगा यांना ३७७ म्हणजे सुमारे ७०% मते मिळाली. या आठवड्याच्या अखेरपर्यंत सुगा जपानचे पंतप्रधान म्हणून शपथ घेण्याचा अंदाज आहे. सुगा यांनी ८ वर्षे देशाचे चीफ कॅबिनेट सेक्रेटरी म्हणून सेवा केली आहे. त्यांना आबे यांचे निकटवर्तीय मानले जाते. पीएम झाल्यानंतर सुगा यांच्यासमोरही तीच आव्हाने असतील, जी शिंजो आबे यांच्यासमोर होती. कोरोना महामारीच्या काळात जपानची अर्थव्यवस्था मजबूत करणे मोठे आव्हान असेल. संरक्षण व परराष्ट्र धोरणांमध्ये सुगा हे शिंजो आबे यांच्या धोरणांवरच चालतील असे जाणकारांचे मत आहे. ते आबेंचे मार्गदर्शन व सल्ला घेतील. जाणकारांचे मत आहे की, नव्या पंतप्रधानांनंतरही भारत-जपानचे संबंध कायम राहतील. नरेंद्र मोदी यांचे आबे यांच्यासोबत जसे मैत्रीचे संबंध होते तसेच नव्या पंतप्रधानांसोबत राहतील. विशेष म्हणजे दोन्ही देश चीनचा बेल्ट अँड रोड प्रोजेक्टला विरोध करत आहेत. यूएन सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्व मिळवण्यासाठी दोन्ही देश एकमेकांना पाठिंबा देतात. आता दोघे मिळून चीनच्या आक्रमकतेचाही सामना करतील.

टोकियो आंतरराष्ट्रीय क्रिस्टियन विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय संबंधांचे सहयोगी प्राध्यापक स्टीफेन नेगी सांगतात, चीनच्या तुलनेत जपानसाठी भारत चांगला पर्याय आहे. जपान मोठी रक्कम भारतात गुंतवणूक करण्यास इच्छुक आहे.

पीएम मोदी व शिंजो आबे यांच्यात अर्धा तास चर्चा

१० सप्टेंबरला भारत आणि जपानदरम्यान एक महत्त्वाचा लष्करी करार झाला. याअंतर्गत दोन्ही देशांत लॉजिस्टिकल सपोर्ट वाढेल. इंडो पॅसिफिक क्षेत्रात चीनच्या आक्रमक भूमिकेचा सामना करणे दोन्ही देशांना सोपे जाईल. या करारांतर्गत दोन्ही देशांचे लष्कर इंधन, खाद्य व इतर साहित्य व सेवा वापरतील. करारावर स्वाक्षरीनंतर मोदी व आबे यांच्यात अर्धा तास फोनवर चर्चा झाली. मोदींनी आबे यांना भारत भेटीचे निमंत्रण दिले.