आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नायजेरियात भीषण रस्ता अपघात:बसच्या धडकेत 37 ठार, चार दिवसांतील तिसरी मोठी दुर्घटना

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नायजेरियाच्या ईशान्येकडील मैदुगुरी शहराबाहेर तीन बसेसची भीषण धडक होऊन तब्बल 37 जणांचा मृत्यू झाला आहे. देशाच्या रस्ते सुरक्षा संस्थेने ही माहिती दिली. बोर्नो राज्याच्या रस्ता सुरक्षा एजन्सीचे प्रमुख उताने बोई यांनी सांगितले की, दोन बसेसची समोरासमोर टक्कर होऊन आग लागल्याने हा अपघात झाला. याचदरम्यान, तिसर्‍या बसनेही त्यांना धडक दिली आणि अपघाताची तीव्रता आणखी वाढली.

बोई म्हणाले की, "आतापर्यंत 37 जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे आणि त्यापैकी बहुतेकांची ओळख पटलेली नाही, कारण ते पूर्णपणे जळाले आहेत." बोर्नो राज्याची राजधानी मैदुगुरीपासून 35 किलोमीटर (20 मैल) अंतरावर असलेल्या जकाना गावाजवळ ही टक्कर झाली. एका बसचा टायर फुटून विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनावर धडकल्याने ही धडक झाली.

मृतदेह एकत्रितपणे दफन केले जातील

फेडरल रोड सेफ्टी कॉर्प्सच्या सेक्टर कमांडरने पत्रकारांना सांगितले की, हा अपघात जास्त वेगामुळे झाला. "एका बसचे नियंत्रण सुटले आणि ती उलटून दुसऱ्या बसवर आदळली." बुधवारी (23 नोव्हेंबर) प्रशासनाच्या देखरेखीखाली मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

नायजेरियात रस्ते अपघात नित्याचेच

आफ्रिकेतील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या नायजेरियाच्या खराब देखभाल केलेल्या रस्त्यांवर अपघात सामान्य आहेत, मुख्यत्वे वेगाने आणि वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे. याआधी मंगळवारी नायजेरियाची राजधानी अबुजाजवळ बसची ट्रकला धडक बसून झालेल्या अपघातात 17 जण ठार, तर चार जखमी झाले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीडित ईशान्य गोम्बे राज्यातून प्रवास करत होते. याशिवाय, टायर फुटल्यानंतर उत्तरेकडील कानो शहराबाहेरील धरणात ओव्हरलोड कार कोसळल्याने शनिवारी नऊ जणांचा मृत्यू झाला होता.

बातम्या आणखी आहेत...