आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

नशीब :30 मुलांच्या पित्यास खोदकामात सापडलेल्या रत्नांची 25.5 कोटीत विक्री, जांभळ्या व निळ्या रंगाच्या दगडांनी बदलले नशीब

दार ए सलम6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चार बायका व ३० हून अधिक मुलाचा पिता असलेल्या टांझानियाच्या एका खाण मालकांचे नशिब रात्रीतून उजळले. त्याला दोन दुर्मिळ रत्ने सापडली. सरकारने सुमारे २५.५ कोटी रुपये (७.७४ अब्ज शिलिंग) रुपये इतकी रक्कम त्यास दिली आहे. खाण मालक सनिनियू लेजियर यास टांझानाइटचे दोन दुर्मिळ रत्न उत्तर टांझानियाच्या खाणीत सापडले होते. यापैकी एक ९.२७ व दुसरा ५.१० किलोचा होता. आजवर सापडलेल्या रत्नांत ही सर्वात मोठी रत्ने आहेत. येथील खाण मंत्री सायमन मसनजिला यांनी सांगितले, यापूर्वी कधी इतक्या मोठ्या आकाराची टांझानाइट पाहण्यास कधी मिळालेली नव्हती. वांग्याच्या रंगाचे व सुमारे एक फूट लांबीच्या दुर्मिळ दगडांना बँक आॅफ टांझानिया यांनी विकत घेतले आहे. देशाचे राष्ट्राध्यक्ष जॉन मागुफूली यांनी लेजियर यांचे अभिनंदन केले आहे.

0