आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काबूल:तालिबानकडून हत्येच्या भीतीने महिला न्यायाधीश दडून बसल्या! अफगाणच्या 220 महिला जजेसना हत्येची भीती

काबूल / डेव्हिड जुच्चीनो3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अफगाणिस्तानातील हिंसाचार अद्यापही थांबलेला नाही. त्यातही महिलांवरील अत्याचार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आता महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कैद्यांना शिक्षा ठोठावणाऱ्या महिला न्यायाधीशांचे प्राण संकटात सापडले आहेत. अफगाणिस्तानात तुरुंगातून सुटलेले कैदी त्यांना शिक्षा करणाऱ्या महिला न्यायाधीशांची हत्या करण्यासाठी त्यांचा शाेध घेत आहेत.

तालिबानी सत्ता येताच महिला न्यायाधीशांवर दडून बसण्याची वेळ आली आहे. आपल्यासोबत कुटुंबाचीदेखील तालिबान हत्या करेल, अशी भीती महिला न्यायाधीशांना वाटू लागली आहे. तालिबानचे सरकार सत्तेवर आल्यानंतर तुरुंगातील कैद्यांची सुटका करण्यात आली आहे. त्यात तालिबानी लढवय्ये देखील आहेत. त्यांना महिला न्यायाधीशांनी शिक्षा ठोठावली होती. तुरुंगातून सुटल्यानंतर ते या जजचा शोध घेत आहेत.

अफगाणिस्तानात सुमारे २२० महिला न्यायाधीश असून त्या दडून बसल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयात जज राहिलेल्या नबीला म्हणाल्या, तालिबानी शासन लागू होताच माझी नोकरी गेली. मला लपून बसण्याची वेळ आली आहे. एवढेच नव्हे तर मला साधे घराबाहेर देखील जाता येत नाही. हीच परिस्थिती इतर न्यायाधीशांची आहे. तुरुंगातून सुटलेले कैदी त्यांची हत्या करू शकतात.

बातम्या आणखी आहेत...