आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या काही महिन्यांपासून अमेरिका, युरोप आणि कॅनडामधील सरकारांनी चिनी कंपनी बाइटडान्सचे व्हिडिओ अॅप टिकटॉकवर बंदी घालण्याचे वेगवेगळे प्रयत्न केले. गेल्या सोमवारी व्हाइट हाऊसने फेडरल एजन्सीला म्हटले की, त्यांनी ३० दिवसांत सरकारी डिव्हाइसवरून अॅप हटवावे. कॅनडा आणि युरोपियन युनियननेही नुकतेच सरकारी डिव्हाइसवरून अॅपला बंदी घातली. भारताने २०२० मध्ये टिकटॉकसह ५९ चिनी अॅपवर बंदी घातली होती. बुधवारी अमेरिकी संसदेच्या एका समितीने राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना टिकटॉकवर बंदी घालण्याचे अधिकार दिले. पाश्चिमात्य देशांच्या सरकारांना चिंता वाटत आहे की, टिकटॉक आणि बाइटडान्स लोकेशनची माहिती घेऊन वापरकर्त्याचा डेटा चिनी सरकारला देऊ शकते. चुकीची माहिती पसरवण्यासाठी चीन टिकटॉकचा वापर करू शकतो, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. दोन डझनहून अधिक राज्यांनी सरकारी उपकरणांसह अनेक महाविद्यालयांत टिकटॉकवर बंदी घातली आहे. अमेरिकी लष्कर, मरीन कोअर, एअरफोर्स आणि कोस्ट गार्डमध्येही अॅपवर बंदी आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.