आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गोपनीयतेचे संकट:९/११ नंतर टिकून राहिलेले खासगी जीवन कोरोनाच्या दुष्टचक्रात संपण्याची भीती, सतत पाळत राहील

लंडनएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • कोरोनाने दशकांतील परिवर्तन काही आठवड्यांत केले, खासगी माहिती होईल सार्वजनिक

विमानतळावर उतरताच कपात लाळेचा नमुना द्या, तुमचा डीएनए सुरक्षित होईल. तुमच्या राज्य-शहराची सीमा तुम्ही सरकारच्या परवानगीशिवाय ओलांडू शकणार नाही.

ही भविष्यातील दोन चित्रे आहेत, जी अनेक दशकांनंतर अस्तित्वात आली असती; पण कोरोनाने आठवड्यांमध्येच अंमलबजावणी करण्यास भाग पाडले. श्वसनयंत्रणेवर हल्ला करत कोरोनाने केव्हा लोकांची गोपनीयता धोक्यात आणली हे लक्षातच आले नाही. जगभरातील सरकारे लोकांची माहिती गोळा करत आहेत. त्यांच्याकडे आपल्या नागरिकांची सर्व माहिती आहे. सर्वांचा डीएनएदेखील गोळा केला जात आहे. हे सर्व नवीन वस्तुस्थिती बनण्याच्या तयारीत आहेत. एका मोहीम गटाचे संचालक अॅडिन ओमानोव्हिक सांगतात, अशात प्रश्न निर्माण झाला आहे की, कोरोना काळातील हे नवे जग आमची गोपनीयतेची इच्छा संपवेल का? जी आधी थोडीफार शिल्लक होती. खरे म्हणजे अमेरिकेत ११ सप्टेंबर २०११ च्या हल्ल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाळत ठेवण्याचा काळ सुरू झाला होता. लोकांना दहशतीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी ई-मेलवरही पाळत ठेवली गेली. १५ वर्षांपर्यंत कोट्यवधी लोक बिनधास्तपणे सोशल मीडियावर छायाचित्र शेअर करत राहिले. केंब्रिज अॅनालिटिकावर माहिती चोरल्याचा आरोप झाल्यानंतर वादळ उठले.

केंब्रिज विद्यापीठाचे प्रा. जॉन कोक्राफ्ट सांगतात, आता कोविड- १९ ने असाच काळ आणला आहे. गोपनीयतेवर पुन्हा एकदा संकट आले आहे. दक्षिण कोरियात १० हजार मोबाइलवर पाळत ठेवली जात आहे. इंग्लंडचा डेटाबेस एवढा सक्षम आहे की, सरकार जाणू शकते की कोण आजारी आहे आणि कोण त्याच्या जवळ आहे. रशियासारख्या देशांनी लोकांसाठी क्यूआर कोड दिले आहेत. चीन प्रत्येक नागरिकाच्या घराबाहेर कॅमेरे बसवत आहे. ‘द एज सर्व्हिलन्स कॅपिटलिझम’च्या लेखिका शोषना जुबोफ सांगतात, व्यक्ती पुन्हा एकदा तंत्रज्ञानाच्या स्वाधीन आहे. अॅपल आणि गुगल असे तंत्रज्ञान आणत आहेत. फोनद्वारे समजेल की कोण बाधित आहे. महामारीचा काळ संपल्यानंतर ट्रेसिंग संपेल असे म्हणणे अवघड आहे. आपली खासगी माहिती आता सार्वजनिक झाल्याचे वर्ष २०२० च्या अखेरीस समजेल, अशी शक्यता आहे.

हे सर्व जीवनाचा कायमचा भाग होईल

तज्ञांचे म्हणणे आहे की, ९/११ नंतर काही काळासाठी उचललेली पावले आयुष्याचा भाग झाली होती. या वेळीही असेच होईल. गोळा केली जात असलेली माहिती लोकांच्या आयुष्याचा कायमचा भाग होईल. ते प्रत्येक क्षणी पाळतीखाली राहतील.

बातम्या आणखी आहेत...