आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:भुतांच्या भीतीने जपानच्या पंतप्रधानांचे आलिशान घर 9 वर्षांपासून ओस, सुगा यांनीही 8 महिन्यांपासून लहान घरात राहणे केले पसंत!

वॉशिंग्टन13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भव्य ‘सोरी कोटेई’ निवासस्थान सोडून जपानी पंतप्रधानांचा लहान वसाहतीत मुक्काम

जपानमध्ये पंतप्रधानांच्या सरकारी निवासस्थानाचे नाव ‘सोरी कोटेई’. परंतु भूतांच्या भीतीने गेल्या ९ वर्षांपासून एकही पंतप्रधान तेथे राहायला आले नाहीत. या निवासस्थानाचा इतिहास अतिशय हिंसक राहिला. त्यामुळेच अनेक प्रकारच्या अफवा पसरल्या. हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे आत्मे या परिसरात भटकतात, ही अफवा पुन्हा चर्चेत आली आहे. सुगा यांची गेल्या सप्टेंबरमध्ये पंतप्रधान पदावर निवड झाली. परंतु ८ महिन्यांच्या कालावधीनंतरही या भव्य निवासस्थानी राहण्याऐवजी सुगा अतिशय अरुंद अशा वसाहतीमध्ये आले आहेत.पंतप्रधानांच्या निवासस्थानाचा परिसर ५ इमारती २५ हजार चौरस मीटर एवढा आहे. पंतप्रधानांचे निवासस्थान काच व स्टीलद्वारे तयार करण्यात आले. ते आलिशान आहे. परंतु अशा घरात राहण्याऐवजी सुगा यांनी लहान घरात राहण्याचा निर्णय घेतला. या घरात आल्याने सुगा यांच्यावर टीकाही होत आहे. सुगा यांच्या आधी शिंजो अॅबे देखील या निवासस्थानी गेले नव्हते. परंतु निवासस्थान राहण्यासाठी आरामदायी नाही. त्यामुळे सुगा तेथे स्थलांतरित होणे टाळत आहेत, असा दावा टेम्पल विद्यापीठाचे प्रोफेसर हिरोमी मुराकमी यांनी केला.

नोडा निवासस्थानी राहणारे शेवटचे पंतप्रधान
योशिहिको नोडा म्हणाले, निवासस्थानी कोणीही राहत नसले तरी त्याच्या देखभालीवर दरवर्षी सुमारे ११ कोटी रुपये खर्च होत आहेत. सुगा या निवासस्थानी राहायला का जात नाहीत? हे मला समजण्यापलीकडचे आहे. त्या घरात राहणारे नोडा जपानचे शेवटचे पंतप्रधान ठरले. ते डिसेंबर २०१२ पर्यंत सत्तेवर होते.

निवासस्थानी पंतप्रधान, नातेवाइकांचाही नरसंहार

  • १९३२ मध्ये तत्कालीन पंतप्रधानास ११ नौदल अधिकाऱ्यांनी गोळ्या घातल्या होत्या.
  • चार वर्षांनंतर पंतप्रधान केईसुके व त्यांच्या मेहुण्यासह चार जणांची हत्या.
  • २००० मध्ये योशिरो यांनी भूतांना पळवण्यासाठी पुजाऱ्यास बोलावले होते.
  • योशिरोने मित्रांना म्हणाले, रात्री मला सैनिकांच्या आेरडण्याचा आवाज आला.
  • पंतप्रधान जुनिचिरो कोईजुमीने यांनीही भूत पळवण्यासाठी पुजाऱ्याला बोलावले होते.
बातम्या आणखी आहेत...