आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जाे बायडेन यांच्या शपथ समारंभादरम्यान डाेनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक जाेरदार निदर्शने करू शकतात, अशी भीती अमेरिकेची केंद्रीय तपास संस्था एफबीआयने वर्तवली आहे. आंदाेलनादरम्यान हे लाेक शस्त्रांचा देखील वापर करू शकतात. त्यामुळेच २० जानेवारी राेजी अमेरिकेतील सर्व राज्यांच्या राजधानीबराेबरच वाॅशिंग्टन डीसीमध्ये देखील ट्रम्प समर्थक निदर्शने आयाेजित करणार आहेत.
६ जानेवारीला कॅपिटल हिलमध्ये झालेल्या घटनेनंतर सर्व ठिकाणची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. बायडेन यांच्याटीमने आधीच आपल्या समर्थकांना समारंभास उपस्थित राहू नये, असे सांगितले आहे. त्यासाठी वाॅशिंग्टन डीसीला येऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. ६ जानेवारी सारख्या घटनेची पुनरावृत्ती हाेऊ दिली जाणार नाही, अशी अपेक्षा सुरक्षा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. एफबीआयच्या इशाऱ्यानंतर सुरक्षा व्यवस्था कडक केली जात आहे.सभागृहाचे सदस्य २५ व्या दुरुस्तीबाबत मत टाकतील. त्याच्या बाजूने निकाल लागल्यास उपराष्ट्राध्यक्ष पेन्स यांना ट्रम्प यांना पदावरून हटवण्याचा निर्णय घ्यावा लागू शकताे.
दोनवेळा महाभियाेग
बुधवारी डेमाेक्रॅट खासदार ट्रम्प यांच्या विराेधात महाभियाेगाचे प्रकरण चालवण्याच्या प्रस्तावावर मतदान करतील. डेमाेक्रॅटकडे बहुमत आहे. त्यामुळे त्याची परवानगी मिळेल. तसे झाल्यास दाेनवेळा महाभियाेग चालवण्यात आलेले ट्रम्प हे अमेरिकेच्या इतिहासातील पहिले अध्यक्ष असतील. या आधी डिसेंबर २०१९ मध्येही महाभियाेग चालवण्यात आला हाेता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.