आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Fear Of Taliban Infiltration Into Pakistan; The Imran Government Was Shaken By The Barbed Wire Fence On The Border, Which Wreaked Havoc In Afghanistan

घाबरगुंडी:तालिबान पाकमध्ये घुसण्याची भीती; सीमेवर काटेरी कुंपण, अफगाणिस्तानात कहर झाल्याने इम्रान सरकार हादरले

इस्लामाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अफगाणिस्तानात तालिबानचा कहर वाढत चालल्याचे पाहून पाकिस्तान सतर्क झाला आहे. ताजिकिस्ताननंतर पाकिस्ताननेदेखील अफगाणिस्तान सीमाबंदी केली आहे. सोबतच सीमेवर सैन्यही तैनात केले. तालिबान पाकिस्तानात घुसू शकतो, अशी भीती इम्रान सरकारला वाटू लागली आहे. सीमेच्या संरक्षणासाठी पाकिस्तान व अफगाणिस्तानने गेल्या आठवड्यात सीमेवर काटेरी कुंपण लावले. अफगाणिस्तानजवळील २,६४० किमी लांबीच्या सीमेवर पाकिस्तान सतर्क आहे. ‘द डॉन’ने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अमेरिकी व नाटो सैन्याच्या परतीनंतर पाकिस्तानने देखील अफगाण सीमेवरील प्रमुख चाैक्यांवर सैनिकांना तैनात केले.

भारतीयांसाठी सुरक्षेचा सल्ला
अफगाणिस्तानातील वाढते संकट लक्षात घेऊन भारतीय राजदूत कार्यालयाने देशातील नागरिकांसाठी २९ जूनसाठी सुरक्षेचा सल्ला दिला. अफगाणिस्तानात येणाऱ्या, राहणाऱ्या तसेच काम करणाऱ्या भारतीयांनी सुरक्षेबाबत जास्त दक्षता घेतली पाहिजे. सुरक्षेचा मुद्दा गंभीर होत चालला आहे.

३० दहशतवादी ठार
अफगाणिस्तानने तालिबानवर मोठा हवाई हल्ला केला. शुक्रवारी दोन्ही प्रांतांत अफगाण हवाई हल्ल्यात ३३ तालिबानी दहशतवादी ठार झाले तर १७ जण जखमी झाले. देशातील संरक्षण मंत्रालयाने त्यास दुजोरा दिला. दक्षिण हेल्मंडमधील कारवाईत १४ तालिबानी ठार झाले.

सहा हजार रशियन सैनिकांचे ताजिकिस्तानात तळ
क्षेत्रीय पातळीवर अस्थिरतेवर रशियाने चिंता व्यक्त केली. ताजिकिस्तानमध्ये रशियाच्या ६ हजार सैनिकांचा सहभाग असलेल्या सरावाचे आयोजन करण्यात आले आहे. ताजिकिस्तानात रशियन सैन्याचे तळ स्थापन करण्यात आले आहे. परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव यांनी याच महिन्याच्या सुरुवातीला इशारा दिला होता. आमच्या सहकाऱ्यांच्या विरोधात आक्रमक कारवाई रोखण्यासाठी काहीही करू शकतो.

बातम्या आणखी आहेत...