आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वॉशिंग्टन:बायडेन यांच्या शपथेवेळी हिंसाचार भडकण्याची भीती, स्फोटकांचा ट्रक जप्त

वॉशिंग्टन3 महिन्यांपूर्वीलेखक: मोहम्मद अली
  • कॉपी लिंक
  • जारमध्ये भरून नेले होते पेट्रोल, स्टायरोफोम

पोलिसांच्या ताब्यातील एक आरोपीने दिलेल्या कबुलीनुसार हिंसाचारादरम्यान आंदोलक काचेच्या जारमध्ये पेट्रोल व द्रवरूप स्टायरोफोम (पातळ प्लास्टिक) भरून नेते होते. या दोन्ही गोष्टींचे मिश्रण केल्यानंतर आग आणखी भडकते, असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याशिवाय पोलिसांच्या कपड्यांचे लहान-लहान तुकडे व लायटर देखील सापडले होते. या सर्व गोष्टी जारमध्ये मिसळून एक विध्वंसक उपकरण तयार होऊ शकते.

जो बायडेन यांच्या शपथ समारंभादरम्यान देशभरात हिंसाचार भडकू शकतो, असा अमेरिकेतील तपास व गुप्तचर यंत्रणेचा अंदाज आहे. कॅपिटल हिल जवळ बाँब व बंदुकांनी भरलेला पिकअप ट्रक पकडण्यात आला होता. त्यामुळे अंदाज मजबूत मानला जातो. ६ जानेवारी रोजी अराजकता पसरलेली होती. ट्रक पकडलेला तोच परिसर आहे. केंद्रीय तपास संस्थेचे अधिकारी म्हणाले, अमेरिकी संसद इमारतीपासून दोन ब्लॉक सोडून एक मिनी ट्रक उभा होता. त्या आधी हे वाहन तेथे नव्हते. ट्रम्प समर्थकांपर्यंत अनेक प्रकारची शस्त्रे पोहोचवण्यात आली होती. त्यावरून हल्ला जास्त हिंसक करण्याचा इरादा होता, हे स्पष्ट होते. बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाने टाकलेल्या धाडीत एका शस्त्रागाराचा पत्ता लागला आहे. ते ट्रम्प समर्थक चालवत होते. वॉशिंग्टन डीसीच्या आजूबाजूला आढळून आलेल्या बॉम्बची तारही या प्रकरणाशी जोडून पाहिली जात आहे. अमेरिकेने कधीही कल्पना केली नव्हती.

एवढा भयंकर हिंसाचार करण्याचा ट्रम्प समर्थकांचा कट होता, असे यावरून दिसून येते. या ट्रकमध्ये एम-४ कार्बाइन असॉल्ट रायफल, एक हँडगन व ११ गावठी बाॅम्ब ठेवलेले होते. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा अधिक दक्ष झाली आहे. बायडेन यांच्या शपथ समारंभाच्या दरम्यान देखील मोठा हिंसाचार होऊ शकतो. तपासामध्ये आणखी काही गोष्टी स्पष्ट झाल्या. कॅपिटल हिलवरील हल्ल्यावेळी ट्रम्प समर्थक वॉशिंग्टन, जॉर्जिया, कन्सास, आेहियो, मिशिगन, कॅलिफॉर्निया, कोलोरॉडो, उटाह, न्यू मेक्सिको, वोमिंग, टेक्सासच्या स्टेट हाऊस बाहेर देखील मार्च काढत होते. अमेरिकेच्या न्याय विभागाने या हल्ल्याबाबत १३ लोकांच्या विरोधात आरोप निश्चित केले आहेत. त्यात पश्चिम व्हर्जिनियातील एका नेत्याला देखील आरोपी करण्यात आले आहे. पॅलोसी यांच्या टेबलावर पाय ठेवून बसलेल्या व्यक्तीसही अटक झाली.

वॉशिंग्टनला पेटवून देऊ : ट्रम्प समर्थक : इंटरनेटवर ट्रम्प समर्थकांची प्रक्षोभक वक्तव्ये पाहायला मिळत आहेत. ट्रम्प २० जानेवारीला पुन्हा सत्तेची सूत्रे हाती घेतील. आम्ही कम्युनिस्टांना विजयी होऊ देणार नाहीत. भलेही त्यासाठी वॉशिंग्टनला पेटवून देऊ. अशा प्रतिक्रिया ट्रम्प समर्थकांनी दिल्या. ही परिस्थिती पाहता अनेक नेत्यांनी कॅपिटल पोलिसांचे कडक परीक्षण केले जावे, अशी मागणी केली. निदर्शकांना रसद पोहोचवली गेली. असा आरोपही नेत्यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...