आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PAK मध्ये 'युनिसेफ'च्या अधिकाऱ्यावर RAPE:​​​​​​​अंगरक्षकानेच केला बलात्कार, 2 महिन्यांपूर्वी स्वीडनहून आली होती पीडित

इस्लामाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानात युनिसेफच्या (UNICEF) एका महिला अधिकाऱ्यावर बलात्कार झाला आहे. या प्रकरणी तिच्या अंगरक्षकाला अटक करण्यात आली आहे. सदर 27 वर्षीय महिला अधिकारी स्वीडनची असून, तिची मार्च महिन्यात इस्लामाबादला पोस्टिंग झाली होती. ती पाकची राजधानी इस्लामाबादच्या चोख सुरक्षा असणाऱ्या पॉश भागात एकटी राहते.

या प्रकरणी पाक सरकारने अद्याप कोणतेही निवेदन जारी केले नाही. राजकीय दबावामुळे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे प्रकरण दाबण्याच्या प्रयत्न करत आहेत.

स्वतःच्याच बंगल्यात रेप

‘जिओ न्यूज’च्या वृत्तानुसार, ही स्विडीश महिला इस्लामाबादच्या पॉश G6/4 भागात एकटी राहते. ती मार्चमध्ये स्वीडनहून पाकिस्तानात बदलीवर आली होती. तिने या प्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. तिने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, ती बुधवारी रात्री लवकर झोपली. रात्री 11.30 च्या सुमारास कुणीतरी माझ्या खोलीचा दरवाजा उघडला. त्यावेळी रुमचे दिवे बंद होते. त्यामुळे अंधारात मला काहीच दिसले नाही. तेव्हा एका व्यक्तीने मला पाठीमागून पकडून पूर्ण ताकदीने माझे तोंड दाबले. त्यानंतर माझ्यावर बलात्कार केला. माझा जीव गुदमरत होता. मी हात जोडून त्याला वॉशरुममध्ये जाण्याची परवानगी मागितली. त्यावेळी मला बलात्काऱ्याचा चेहरा दिसला. तो माझा अंगरक्षक होता.

इस्लामाबाद पोलिसांनी या हाय प्रोफाइल बलात्कारकांडावर बोलण्यास नकार दिला आहे.
इस्लामाबाद पोलिसांनी या हाय प्रोफाइल बलात्कारकांडावर बोलण्यास नकार दिला आहे.

पोलिसही मौन

पीडित महिला अधिकाऱ्याने पोलिसांत गुन्हा दाखल केला. पण, इस्लामाबाद पोलिस व गृह मंत्रालयाने अद्याप या प्रकरणी कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, आरोपीला अटक करुन त्याची गुप्त ठिकाणी चौकशी केली जात आहे. युनिसेफनेही आतापर्यंत याची कोणतीही माहिती दिली नाही. परराष्ट्र व गृह मंत्रालय याविषयी लवकरच विस्तृत निवेदन देण्याची शक्यता आहे.

गतवर्षी ब्रिटनच्या एका महिलेवर लाहोर हायवेवर झाला होता सामूहिक बलात्कार.
गतवर्षी ब्रिटनच्या एका महिलेवर लाहोर हायवेवर झाला होता सामूहिक बलात्कार.

परदेशी महिला निशाण्यावर

गतवर्षी लाहोर राष्ट्रीय महामार्गावर एका ब्रिटीश महिलेवर सामूहिक बलात्कार झाला होता. या घटनेनंतर पाकिस्तान व ब्रिटनच्या संबंधांत मोठा तणाव निर्माण झाला होता. पाक पोलिसांना त्यानंतर 2 महिन्यांपर्यंत आरोपींना अटक करता आली नव्हती.

ही ब्रिटीश महिला आपल्या 2 मुलांसह लाहोरहून रावळपींडीला जात होती. आरोपींनी तिच्या कारचा पाठलाग केला. अज्ञात ठिकाणी कारला ओव्हरटेक करुन तिचा अडवले. त्यानंतर प्रथम लूटमार व नंतर बलात्कार केला. त्यानंतर काही महिन्यांनी पाकवंशाच्या एका अमेरिकन महिलेचीही बलात्कारानंतर निघृण हत्या करण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...