आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Fie Accident In New York City 19 People Including 9 Children Killed, More Than 50 Injured | Marathi News

न्यूयॉर्कमधील अपार्टमेंटला लागलेल्या आगीत 19 ठार:मृतांमध्ये 9 मुले, 50 हून अधिक जखमी; 12 जणांची प्रकृती गंभीर

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क शहरातील एका अपार्टमेंटमध्ये लागलेल्या आगीत नऊ मुलांसह १९ जणांचा मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्कमधील ब्रॉन्क्स अपार्टमेंटमध्ये रविवारी सकाळी झालेल्या या भीषण घटनेत 50 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींना पाच वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. यासोबतच, अपार्टमेंटच्या प्रत्येक मजल्यावर राहणाऱ्या लोकांना आगीच्या धुरामुळे श्वास घेण्यास त्रास होत होता. अग्निशमन विभागाचे आयुक्त डॅनियल निग्रो यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

आगीचे कारण अद्याप स्पष्ट नाही
आग कशी लागली याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पण न्यूयॉर्क शहराचे महापौर एरिक अॅडम्स यांच्या म्हणण्यानुसार ही आग रूम हिटरमुळे लागली असावी. महापौरांनी ही आग शहरातील सर्वात भीषण आग असल्याचे सांगितले.

अग्निशमन आयुक्त डॅनियल निग्रो यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, आग इतकी भीषण होती की, तिने 19 मजली इमारतीला कवेत घेतले. अग्निशमन दलाच्या 200 बंबांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...