आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय मजुरांचे मृत्यू कतारने लाच देऊन लपवले:युरोपियन खासदारांवर छापेमारी; एकाकडे 8, तर दुसऱ्याकडे 5 कोटी आढळले

ब्रुसेल्स2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कतारमध्ये होत असलेला फिफा विश्वचषक सुरुवातीपासूनच वादांच्या भोवऱ्यात सापडला आहे. आता तो संपण्याच्या एक दिवस आधी आणखी एका वादामुळे कतारच्या अडचणीत वाढ झाली आहे. खरं तर, बेल्जियम पोलिसांनी युरोपियन संसदेच्या सदस्याच्या घरावर आणि त्यांच्या वडिलांच्या ब्रुसेल्समधील हॉटेल रूमवर छापा टाकला.

पोलिसांच्या या छाप्यात 8 कोटी रुपये सापडले आहेत. विश्वचषकाच्या तयारीतील मजुरांच्या मृत्यूसह अनेक वाद दडपण्यासाठी कतारकडून कोट्यवधींची लाच घेतल्याचा आरोप EU खासदारावर आहे.

युरोपियन युनियन खासदाराच्या घरावर आणि वडिलांच्या हॉटेलवर छापे टाकल्यानंतर बेल्जियम पोलिसांनी जप्त केलेल्या पैशांचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत.
युरोपियन युनियन खासदाराच्या घरावर आणि वडिलांच्या हॉटेलवर छापे टाकल्यानंतर बेल्जियम पोलिसांनी जप्त केलेल्या पैशांचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत.

कतारमधील फिफा विश्वचषकाच्या निमित्ताने युरोपियन युनियनच्या खासदारांवर भ्रष्टाचाराचे आरोप

कतारमधील स्थलांतरित मजुरांची गरीब परिस्थिती आणि संबंधित वाद दडपण्याच्या बाबतीत युरोपियन युनियनचे खासदार दीर्घकाळापासून संशयाच्या भोवऱ्यात आहेत. वृत्तानुसार, कतारने FIFAच्या आयोजनादरम्यान अनेक युरोपियन कायदे निर्मात्यांना त्यांची टीका दडपण्यासाठी लाच दिली होती. पैशांव्यतिरिक्त त्यांना वर्ल्ड कपची तिकिटे आणि कतारला मोफत भेट देण्याची संधी देण्यात आली.

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आतापर्यंत 20 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. याप्रकरणी युरोपियन युनियनच्या संसदेवरही छापा टाकण्यात आला आहे. खरं तर, कतारवर आरोप होता की फिफाच्या तयारीदरम्यान निर्मिती कामात 6,500 हून अधिक कामगारांचा मृत्यू झाला. अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलने एका अहवालात सांगितले होते की, गेल्या 10 वर्षांत कतारमध्ये 15021 स्थलांतरित मजुरांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी सर्वाधिक 2711 मजूर भारतातील होते. मात्र, विश्वचषकाशी संबंधित बांधकामादरम्यान या मजुरांचा मृत्यू झाल्याचे सिद्ध झालेले नाही. यापूर्वी या मजुरांच्या मृत्यूचा मुद्दा EU संसदेत मोठा गाजला होता. त्यामुळे कतारची आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनामी झाली होती.

कतारने लाच देऊन फिफा विश्वचषकाचे यजमानपद विकत घेतल्याचे आरोप आहेत.
कतारने लाच देऊन फिफा विश्वचषकाचे यजमानपद विकत घेतल्याचे आरोप आहेत.

आतापर्यंत दोन EU सदस्यांवर कारवाई

बुधवारच्या छाप्यापूर्वीच ग्रीसमधील युरोपियन संसदेच्या सदस्या इव्हा कायली यांना कतारकडून लाच घेतल्याच्या आरोपाखाली शुक्रवारी बेल्जियममध्ये अटक करण्यात आली. तपास पूर्ण होईपर्यंत त्यांना कोठडीत ठेवण्यात येणार आहे. त्याच वेळी, इटलीचे EU खासदार अँटोनियो पंझेरी यांच्यावरही या घोटाळ्यात सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्या घरावर छापा टाकून पोलिसांनी 5 कोटी रुपये जप्त केले. यासोबतच कतारने प्रायोजित केलेल्या 87 लाख रुपयांच्या कौटुंबिक सहलीला गेल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

ब्रिटिश खासदारापर्यंत वादाची झळ

पॉलिटिकोच्या मते, युरोपियन युनियनच्या खासदारांव्यतिरिक्त, यूकेच्या खासदारांवर ऑक्टोबर 2021 पासून अनेक वेळा कतार सरकारकडून भेटवस्तू मिळाल्याचा आरोप आहे. यावर अॅम्नेस्टी इंटरनॅशनलचे साचा देशमुख म्हणाले की, कोणत्याही नेत्याने कतारकडून पैसे किंवा भेटवस्तू घेऊ नयेत. त्यापेक्षा त्यांनी तिथे होत असलेल्या मानवी हक्कांच्या उल्लंघनाविरुद्ध पावले उचलली पाहिजेत.

बातम्या आणखी आहेत...