आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवीन शोध:अंतराळात पहिल्यांदा मिळाले पाचव्या अवस्थेतील घटक, 100 वर्षांपूर्वी शास्त्रज्ञ बोस आणि आइंस्टीन यांनी केली होती भविष्यवाणी

पॅरिस9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये करण्यात आला प्रयोग, नेचर जर्नलमध्ये शोध प्रकाशित
  • शोधामुळे ब्रह्मांडाची उत्पत्ती कशी झाली आणि अंतराळातील अनेक गुपित समोर येतील

शास्त्रज्ञांना पहिल्यांदा अंतराळात पदार्थाच्या पाचव्या अवस्थेचे पुरावे मिळाले आहेत. त्यांचे म्हणने आहे की, यातून ब्रह्मांडतील गुपितं आणि याच्या उत्पत्तीबाबत माहिती मिळू शकेल. भारतीय शास्त्रज्ञ सत्येंद्र नाथ बोस आणि अल्बर्ट आइंस्टीन यांनी पदार्थच्या या अवस्थेबाबत 100 वर्षांपूर्वीच 1920 मध्ये भविष्यवाणी केली होती. यामुळेच याला 'बोस-आइंस्टाइन कंडेनसेट्स '(बीईसी) देखील म्हटले जाते. याचा प्रयोग आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन (आयएसएस)मध्ये करण्यात आला.

कधी बनते पदार्थाची पाचवी अवस्था ?

पदार्थाची ही अवस्था तेव्हा बनते, जेव्हा एखाद्या तत्वाचे परमाणुंना परम शून्य ( झिरो डिग्री केल्विन किंवा मायनस 273.15 डिग्री सेल्सियस)पर्यंत थंड केले जाते. यामुळे त्या तत्वाचे सर्व परमाणु एकजूट होऊन सुपर अॅटम तयार करतात. यालाच पदार्थाची पाचवी अवस्था म्हटले जाते. कोणत्याही पदार्थात त्याचे परमाणु वेगवेगली गती करतात, पण पदार्थाच्या पाचव्या अवस्थेत एकच परमाणू असतो आणि यात तरंगे उठतात.

बीईसीचा पृथ्वीवर अभ्यास अशक्य

शास्त्रज्ञांनी सांगितले की, बीईसी खूप संवेदनशील आहे. जर त्याच्या अवस्थेसोबत काही छेडछाड झाली, तेव्हा तो गरम होऊ शकतो. थोडेही गरम झाल्यावर पदार्थाची पाचवी अवस्था संपुष्टात येते. यामुळेच पृथ्वीवर याचा अभ्यास अशक्य आहे.

शास्त्रज्ञांचे मानने आहे की, बीईसीमध्ये अंतराळाची रहस्यमयी डार्क एनर्जीबाबत माहिती लपली आहे. शास्त्रज्ञ ब्रह्मांडमागे या डार्क एनर्जीचा हात असल्याचे मानतात. या रिसर्चला नेचर जर्नलमध्ये प्रकाशित केले आहे.

पदार्थाच्या चार अवस्था 

पदार्थाच्या चार अवस्था असतात. घन, द्रवपदार्थ, गॅस आणि प्लाझ्मा. प्लाज्मा गॅसीय अवस्थाच असते, पण ती आयनीकृत आहे. असे सांगितले जाते की, आकाशातील तारे प्लाज्मामधून बनतात आणि ब्रह्मांडात 96% प्लाज्माच आहे.

बातम्या आणखी आहेत...