आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Fight With Corona : Relatives' Efforts To Rehabilitate Grandmothers Early; Praying From Video Every Day, Listening To Things Too!

दिव्य मराठी विशेष:आजींना लवकर ठणठणीत करण्यासाठी नातेवाइकांचे प्रयत्न; रोज व्हिडिओवरून प्रार्थना, गोष्टीही ऐकवत!

न्यूयॉर्कएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनामुळे आयसीयूमध्ये भरती महिलेला बरे करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न

(शेरी फिंक)

मार्सेला रेंडन न्यूयॉर्कच्या लाँग आयलँड हॉस्पिटलमध्ये चार आठवड्यांनंतर आजीच्या भेटीसाठी गेल्या. तेव्हा आरोग्य कर्मचाऱ्यांनी आजीच्या आवडीचे गाणे कोणते? असे विचारले. मार्सेला यांनी नातेवाइकांना फोन करून त्याबद्दल विचारले. आजींना स्पॅनिश धार्मिक गीत आवडते हे समजले. मार्सेला व त्यांचे पती एडिल्सन यांनी आयसीयूच्या काचेतून आजींना पाहिले. त्याच वेळी त्यांनी ईश्वराला प्रार्थना केली. काहीतरी चमत्कार कर. त्यांना हिरावून नेऊ नको. ही कहाणी आहे ७४ वर्षीय कार्मन एव्हेलिया टोरोची यांची.

कार्मन मार्चमध्ये कोलंबियात एका कौटुंबिक कार्यक्रमातून परतल्या होत्या. तेव्हापासूनच त्यांचे अमेरिका, कोलंबिया व इतर ठिकाणचे डझनावर नातेवाईक, मुले-मुली, नातू-पणतू दररोज व्हिडिआे कॉल व कॉन्फरन्सने सामूहिक प्रार्थना करत होते. बरे झालेले लोक त्यांना सकारात्मक गोष्टीही सांगत होते. एप्रिलमध्ये डॉक्टरांनी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले. आयसीयूचे प्रमुख डॉ. एरिक गॉट्समन म्हणाले, आम्ही उपचाराची यादी बनवली आणि त्यांना वाचवण्याचेही प्रयत्न करत आहोत. परंतु त्यात यश मिळू शकले नाही.

अखेर कुटुंबाने त्यांचा जड अंत:करणाने निरोप घेतला. कार्मन यांच्यासाठी आजारी पडणे असामान्य गोष्ट होती. कारण त्या ठणठणीत होत्या. त्या तीन मजली इमारत सहज चढून जाऊ शकत होत्या. गिर्यारोहण, वेटलिफ्टिंग, स्विमिंगही त्या करत होत्या. फिटनेस व एनर्जीमुळे कुटुंबातील लोक त्यांना रॉकेट ग्रँडमदर असे संबोधत.

नातेवाईक दररोज प्रेम, निष्ठेवर आधारित प्रार्थना करत

कार्मन आजींसाठी कुटुंबीय तसेच नातेवाईक त्या लवकर ठणठणीत व्हाव्या यासाठी वेगवेगळ्या संकल्पनेवर आधारित प्रार्थना करत. त्यात विश्वास, प्रेम, कृतज्ञता, धैर्य, दया, आज्ञाधारकपणा, निष्ठा, प्रामाणिकपणा, समर्पण इत्यादी विषय होते. कार्मन यांची मुलगी मार्सेला पाहण्यासाठी रुग्णालयात गेल्या होत्या. त्या दिवशी प्रार्थनेची थीम चमत्कार होती.

बातम्या आणखी आहेत...