आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाँग मार्च आता उद्यापासून:इम्रान हल्लाप्रकरणी 24 तासांत गुन्हा दाखल करा : सुप्रीम कोर्ट

इस्लामाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने इम्रान खान यांच्यावरील हल्ल्याच्या प्रकरणात कडक भूमिका घेतली आहे. पाकिस्तानचे मुख्य न्यायमूर्ती उमर अता बंदियाल यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने पंजाब पोलिस प्रमुखांना २४ तासांत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. गुन्हा दाखल न झाल्यास न्यायालय स्वत: या प्रकरणाची दखल घेईल. इम्रान यांचा पक्ष पीटीआयने हल्ल्यात लष्कराचे मेजर फैजल नजीरला आरोपी करावे यासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यासाठी २ नोव्हेंबर रोजी हल्ल्यानंतरही गुन्हा दाखल झालेला नाही. पीटीआयने ९ नोव्हेंबरपासून लाँग मार्च सुरू करणार असल्याचे जाहीर केले आहे.

बातम्या आणखी आहेत...