आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Find Out Where Corona Is Most Prevalent Via Mobile, Also Track When You Went Out; Research By U.S. Scientists Based On Pre And Post epidemic Figures

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संशोधन:मोबाइलद्वारे समजेल कोरोनाचा जास्त प्रसार कुठे, तुम्ही केव्हा बाहेर निघाले याचाही माग घेतला; महामारीच्या आधी आणि नंतरच्या आकड्यांच्या आधारे अमेरिकी शास्त्रज्ञांचे संशोधन

वॉशिंग्टन4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लोकेशन डेटा लहान भागात विभागून जागेनुसार माग घेतला

तुमच्या मोबाइल फोनच्या लोकेशन डेटामधून कोरोना काळात बरीच माहिती मिळत असल्याचा दावा अमेरिकेच्या संशोधकांनी त्यांच्या संशोधनात केला आहे. यामुळे कोरोनाग्रस्त भागाची माहिती मिळाली. लॉकडाऊन पुन्हा लागू करायचे की नाही हेदेखील ठरवता येईल. मनाई करूनही लोक घरातून किती बाहेर निघाले याचाही माग घेण्यात आला. या संशोधनात सहभागी हार्वर्ड वैद्यकीय महाविद्यालयाचे सहायक प्राध्यापक शिव टी. सेहरा सांगतात की, लोकेशन डेटा गुगलवर सार्वजनिकरीत्या उपलब्ध आहे. महामारीच्या आधी व नंतरच्या आकड्यांच्या आधारे हे संशोधन दोन भागात करण्यात आले. आधी जानेवारी आणि फेब्रुवारी मध्य २०२० पर्यंत युजरच्या लोकेशनचा डेटा वेगळा केला. या वेळी स्थिती चांगली होती. त्यानंतर फेब्रुवारी मध्यापासून मे २०२० पर्यंत लोकेशन डेटा वेगळा केला. या वेळी संसर्गाची आकडेवारी वेगाने वाढत होती. दोन्ही स्थितीतील आकड्यांची तुलना करण्यात आली. लोकांच्या लोकेशनचा डेटा लहान लहान भागात जागेच्या दृष्टीने विभागण्यात आला. ज्यांचा माग घेण्यात येत होता त्यांचे घर ते कार्यालय, घर, रिटेल स्टोअर, किराणा दुकान, पार्क आदी किती लांब आहे याचा शोध घेण्यात आला. दोन्हींची तुलना केल्यावर समजले की, ज्या देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले तेथे लोक कार्यालयात जात होते, दुकानात खरेदी करत होते. ज्या शहरातील लोक घरात होते तेथे रुग्ण कमी होते.

कार्यालयात मोबाइल फोनचा वापर करण्याची वेळ घटली

संशोधकांचे म्हणणे आहे की, लोक घरात राहिल्याने अमेरिकेत कार्यालयात मोबाइल वापरण्याच्या वेळेत घट झाली आहे. या काळात कोरोनाचे रुग्ण कमी होते. हे संशोधन करणारे अमेरिकेच्या पेन्सिल्वेनिया विद्यापीठाचे संशोधक सांगतात की, आतापर्यंत समोर आलेले परिणाम आशादायक आहेत. महामारीत जास्त धोका कोठे आहे हे ठरवण्यात मोबाइल लोकेशनचा डेटा मदत करेल.

जगात चौथे सर्वाधिक मृत्यू असलेल्या मेक्सिकोत मृत्यू प्रमाणपत्रांचा तुटवडा

मेक्सिकाे सिटी | जगात सर्वाधिक मृत्यूत मेक्सिको चौथ्या क्रमांकावर आहे. तेथे अशी स्थिती आहे की, मृतांच्या कुटुंबीयांना देण्यासाठी मृत्यू प्रमाणपत्रही शिल्लक नाहीत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, तीन राज्यांत गेल्या १५-२० दिवसांपासून मृत्यू प्रमाणपत्र संपले आहेत. आता सुमारे दहा लाख मृत्यू प्रमाणपत्र आणखी छापण्यात आले असून ते संबंधित संस्थांना वितरित करण्यात येत आहेत. मेक्सिकोत शुक्रवारी सहा हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळल्याने एकूण बाधितांची संख्या ६.२३ लाख झाली आहे, तर ५२२ मृत्यू झाल्याने आतापर्यंत देशात ६६८५१ मृत्यू झाले आहेत.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser