आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिनलँड निवडणूक:उजव्या पक्षांच्या आघाडीने निवडणूक जिंकली; पेटेरी ऑरपो होणार पंतप्रधान

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

फिनलँड संसदीय निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून उजव्या पक्षाच्या युतीने बाजी मारली. रविवारी झालेल्या मतमोजणीत नॅशनल कोलिशन पार्टीला सर्वाधिक 20.8% मते मिळाली आहेत. त्याच वेळी फिनलँडचा उजव्या विचारसरणीचा लोकवादी पक्ष द फिन दुसऱ्या क्रमांकावर होता. तर पंतप्रधान सन्ना मारिन यांचा पक्ष सोशल डेमोक्रॅट 19.9 % मतांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

निकालानंतर पराभव स्वीकारत फिनलँडच्या पंतप्रधान सना मरिन यांनी आघाडी सरकार स्थापन करणाऱ्या नॅशनल कोलिशन पार्टीचे अभिनंदन केले. त्या म्हणाल्या की, लोकशाहीने निकाल दिला आहे. सना मरिन या केवळ फिनलँडच्याच नव्हे, तर संपूर्ण युरोपच्या पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या सर्वात तरुण नेत्या आहेत. अल्जझीराच्या वृत्तानुसार, पेरी ऑरपो आता सना यांची जागा घेऊ शकतात.

'पुतिन युक्रेनमधून बाहेर पडा'
निकालानंतर नॅशनल कोएलिशन पार्टीच्या पेट्री ऑरपो यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी सर्वप्रथम युक्रेनला युद्धात पाठिंबा देण्याबाबत बोलले. ते म्हणाले की, आम्हाला हे युद्ध अजिबात मान्य नाही, आम्ही युक्रेनला सर्वतोपरी मदत करू. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे नाव घेत ते म्हणाले की, पुतीन युक्रेनमधून बाहेर पडा, आता तुमचा पराभव होणार आहे.

सना मरिनचा व्हिडिओ व्हायरल

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये फिनलँडच्या पंतप्रधान सना मरीन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये त्या दारू पिऊन मैत्रिणींसोबत डान्स करताना दिसल्या होत्या. पंतप्रधान सना मरिन यांनी मित्रांसोबतच्या पार्टीत ड्रग्स घेतल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्यांना ड्रग टेस्ट करण्यासही सांगण्यात आले होते. मात्र, पार्टीत फक्त दारू प्यायली, पण ड्रग्जचे सेवन केले नाही, असे मरीन यांनीस्पष्ट केले. त्यांची औषध चाचणी नंतर निगेटिव्ह आली होती. येथे वाचा संपुर्ण बातमी.

NATO मध्ये सामिल होतेय फिनलँड

​​​​​​​रशिया-युक्रेन युद्धामुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (NATO) च्या सदस्यत्वाचा विस्तार केला जात आहे. फिनलँडच्या पंतप्रधान सना मारिन आणि राष्ट्राध्यक्ष सौली निनिस्टो यांनी आधीच अंतिम निर्णय घेतला आहे की त्यांचा देश नाटो सदस्यत्वासाठी अर्ज करेल. रविवारी, नाटोचे प्रमुख जेम्स स्टेलबर्ग यांनीही सांगितले की ते फिनलँडला फास्ट-ट्रॅक सदस्यत्व देतील. त्यामुळे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यावर दबाव वाढणार आहे.​​​​​​​ येथे वाचा संपुर्ण बातमी.