आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफिनलॅंड मंगळवारी नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (NATO) चा नवीन सदस्य बनणार आहे. या लष्करी आघाडीत फिनलॅंड सामील होणारा हा 31 वा देश असणार आहे. नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टॉलेनबर्ग यांनी सोमवारी ही माहिती दिली. नाटोचे मुख्यालय ब्रुसेल्स येथे असून मंगळवारी या ठिकाणी विशेष समारंभ होणार आहे. यावेळी फिनलॅंडला नाटोचे सदस्य बनविण्याची औपचारिकता पूर्ण केली जाणार आहे.
यादरम्यान स्टॉलनबर्ग यांनी सांगितले की, नाटो या बैठकीत युक्रेनसाठी बहु-वर्षीय समर्थन कार्यक्रमावरही चर्चा करेल. ते म्हणाले- मला आशा आहे की, युक्रेनसाठी बहु-वार्षिक कार्यक्रम बनवण्यासाठी युतीचे सर्व सदस्य समर्थन करतील. रशिया-युक्रेन युद्धासाठी हे आवश्यक आहे.
ऐतिहासिक आठवडा
असे मानले जात आहे की, लवकरच स्वीडन देखील नाटोचा एक भाग होईल. स्टॉलनबर्ग यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले- हा आठवडा आमच्यासाठी ऐतिहासिक असणार आहे. नाटो देश एका व्यासपीठावर येत आहेत. फिनलॅंड आमच्या नाटो कुटुंबाचा नवीन सदस्य बनणार आहे. लवकरच स्वीडन देखील त्याचा भाग होईल अशी अपेक्षा आहे.
स्टॉलनबर्ग हे नॉर्वेचे माजी पंतप्रधान आहेत. ते म्हणाले- पहिल्यांदाच NATO मुख्यालयात फिनलॅंडचा ध्वज फडकवला जाईल. आता त्याच्या सुरक्षेची जबाबदारी नाटो देशांची असेल. फिनलॅंडचे राष्ट्राध्यक्ष साऊली निनिस्टो आणि संरक्षण मंत्री अँटी काइकोनेन ब्रुसेल्सला पोहोचले आहेत. या सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत.
रशियाला अडचण
फिनलॅंडला नाटोमध्ये सामील होण्यास रशियाने विरोध केला आहे. त्यांचे उपपंतप्रधान अलेक्झांडर ग्रुश्को म्हणाले - नाटोच्या प्रत्येक कृतीवर लक्ष ठेवले जात आहे. आम्ही आमचे सुरक्षा सर्कलही वाढवणार आहोत. जर नाटो सैन्य फिनलॅंडमध्ये तैनात असेल तर आम्ही आणखी काही पावले उचलण्याची शक्यता आहे.
फिनलॅंडचा नाटोमध्ये प्रवेश अशा वेळी घडला आहे, जेव्हा त्याची देशभरात मागणी होत होती. याचे कारण रशियाकडून धोका असल्याचे सांगितले जात आहे. पंतप्रधान सन्ना मारिन यांच्या पक्षाचा दोन दिवसांपूर्वी या ठिकाणी पराभव झाला होता. मात्र, त्याही नाटोचा सदस्य होण्यासाठी बराच काळापासून प्रयत्नशील होत्या.
आता स्वीडनकडे नजर
तुर्किये आणि हंगेरी हे असे दोन देश आहेत, जे फिललॅंड आणि स्वीडनचा नाटोमध्ये समावेश करण्यात अडचणी निर्माण करत होते. त्यांनी अनेक अटी देखील घातल्या होत्या. त्यामुळे दोन्ही देशांना सदस्यत्व मिळण्यात अडचण येत होती. मात्र, फिललॅंड या गटात सामील झाला असून, आता स्वीडनकडे नजर लागलेली आहे.
गेल्या आठवड्यात अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी तुर्कियेच्या परराष्ट्रमंत्र्यांशी स्वीडनला सदस्य बनवण्या संदर्भात चर्चा केली होती. NATO मध्ये नवीन सदस्याचा समावेश करण्याची सर्वात महत्वाची अट ही आहे की, गटातील प्रत्येक सदस्याने त्यावर सहमती दर्शविली पाहिजे. नाटोने एका निवेदनात म्हटले आहे - स्वीडनला कोणत्याही किंमतीत एकटे सोडले जाणार नाही.
नाटो काय आहे?
नाटो (NATO) हे उत्तर अटलांटिक करार संघटनेचं (North Atlantic Treaty Organisation) संक्षिप्त रुप आहे. ही एक लष्करी संघटना असून 1949 मध्ये बारा देशांनी या संघटनेची स्थापना केली होती. या बारा देशांमध्ये अमेरिका, कॅनडा, यूके आणि फ्रान्ससारख्या देशांचा समावेश होता. कोणत्याही एका सदस्य देशावर सशस्त्र हल्ला झाल्यास इतर जण मदतीला येतील, या मुद्द्यावर सदस्य देशांमध्ये सहमती झाली होती.
हे ही वाचा
दिव्य मराठी एक्सप्लेनर SCO मुळे भारताने 2 वेळा चीनला झुकवले : NATO ची काऊंटर आहे ही संघटना, चीन-पाकवाल्या SCO मध्ये का आहे भारत?
शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन म्हणजेच SCO च्या बैठकीत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी उझबेकिस्तानमधील समरकंद शहरात पोहोचले आहेत. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे देखील SCO बैठकीत सहभागी होणार आहेत. - येथे वाचा संपूर्ण बातमी
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.