आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेकऑफच्या वेळी आग:चीनच्या चाँगकिंग आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवरून विमान घसरले, 40 जखमी

बीजिंग4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चीनच्या चाँगकिंग आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवरून गुरुवारी सकाळी एक विमान टेकऑफच्या वेळी घसरले. तेव्हा त्याने पेट घेतला. हे तिबेट एअरलाइन्सचे विमान आहे. त्यात विमान कर्मचाऱ्यांसह एकूण १२० प्रवासी होते. आगीमुळे ४० प्रवासी जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. हे विमान चीनच्या चाँगकिंगहून तिबेटच्या न्यांग्चीकडे जात होते.

उड्डाण करतेवेळी कर्मचाऱ्यांना काहीतरी तांत्रिक दोष असल्याची शक्यता वाटली. त्यामुळे लगेच टेकऑफ रोखण्यात आले. विमानाने धावपट्टी पार केली आणि त्याने पेट घेतला. घटनेनंतर धावपट्टी बंद करून बचाव मोहिमेला सुरूवात करण्यात आली. घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. त्या व्हिडिओमध्ये विमानाला आग लागली आहे आणि लोक मागील भागात शिडीने खाली उतरत असल्याचे दिसते. त्यात विमानातून धूर निघताना दिसतो.

गेल्या वर्षी जगभरात १५ मोठ्या विमान दुर्घटना
2021 मध्ये १५ भयंकर अपघात झाले.
दुर्घटनांत एकूण १३४ जणांचा मृत्यू झाला.
2010 मध्ये चीनच्या हेनॉन एअरलाइन्सचे विमान कोसळले होते.

बातम्या आणखी आहेत...