आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगातील सर्वात उंच इमारत असलेल्या बुर्ज खलिफा पासून काही अंतरावर असलेल्या 35 मजली इमारतीला आग लागली. अरब न्यूजनुसार, दुबईतील 35 मजली इमारतीत 7 नोव्हेंबर रोजी उशिरा भीषण आग लागली होती. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. आता या आगीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ज्या इमारतीला आग लागली ती एमार स्कायस्क्रॅपर म्हणून ओळखली जाते. एमार डेव्हलपर्सने बुलेवर्ड वॉक नावाचे 8 टॉवर बांधले होते. एमार स्कायस्क्रॅपर हा असाच एक टॉवर आहे. आग लागल्यानंतर इमारतीत उपस्थित असलेल्या लोकांना तत्काळ वाचविण्यात आले. या दरम्यान, तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आल्याचे अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितले.
पूर्णपणे नष्ट झालेली इमारत
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. दरम्यान, या घटनेनंतर काही लोकांनी फोटो शेअर केले आहेत. या फोटोत इमारती पूर्णपणे काळी झालेली दिसत आहे. ज्यावरून घटनेची तीव्रता समजून येते. सद्या दुबई पोलिस आणि एमार डेव्हलपर्सने या घटनेबाबत कोणतेही वक्तव्य दिलेले नाही.
गगनचुंबी इमारतीच्या सुरक्षेवर प्रश्न
दुबईमध्ये अनेक गगनचुंबी इमारती आहेत. गेल्या काही दिवसात अनेक इमारतींना आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा स्थितीत इमारतींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. एप्रिल 2022 मध्ये लक्झरी स्विसोटेल अल मुरूज हॉटेलला आग लागली. यादरम्यान, कोणीही जखमी झालेले नाही. हॉटेल बुर्ज खलिफाच्या समोर होते. 2015 मध्ये अॅड्रेस डाऊनटाऊन हॉटेलला आग लागली होती. हे हॉटेल बुर्ज खलिफाजवळही होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.